शासकीय अधिकारी-कर्मचारी वृंद लग्नाच्या सोहळयात व्यस्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शासकीय अधिकारी-कर्मचारी वृंद लग्नाच्या सोहळयात व्यस्त

Share This
मुंबई - सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे तर दूर राहिले त्यांची पत्रे घेण्याचा वेळ शासकीय अधिकारी- कर्मचारी वृंद यांस मिळत नाही कारण सर्वजण सहकारी महिला कर्मचा-यांच्या मुलीच्या लग्नाच्या सोहळयात व्यस्त असल्याने अंधेरी पश्चिम येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे संपूर्ण कार्यालय ओस पडलेले होते.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली हे बुधवारी अंधेरी पश्चिम येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर मुंबई कार्यालय पत्र देण्यासाठी गेले होते. तेथील एका शिपायाने सांगितले की दुपार नंतर या, सर्व कार्यक्रमास गेले आहे. गलगली यांनी विनंती केल्यानंतर दुस-या माळयावरील एका अन्य कर्मचा-याने पत्र तर घेतले पण शिक्का दिला नाही. त्या शिपायाने शिक्का शोधण्याच्या प्रयत्न केला पण त्यास सापडले नाही. याबाबत सांगण्यात आले की वैशाली सोडे यांच्याकडे शिक्का असतो आणि त्यांच्याच मुलीचे लग्न आहे. अनिल गलगली यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांस एसएमएस द्वारे तक्रार करत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी वृंदावर कार्यवाहीची करण्याची मागणी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages