भारतात बॅडमिंटनपटू घडवण्यात अकादमींची भूमिका निर्णायक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

२२ डिसेंबर २०१६

भारतात बॅडमिंटनपटू घडवण्यात अकादमींची भूमिका निर्णायक

मुंबई - प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेतील मुंबई रॉकेट्स संघाच्या जर्सीचे लोकार्पण अजय जयराम, राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद आणि बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉय यांच्या उपस्थितीत मुंबई मराठी पत्रकार संघ येथे करण्यात आले.

यावेळी बोलताना भारतात बॅडमिंटनपटू घडवण्यात अकादमींची भूमिका निर्णायक आहे. एका छत्राखाली मार्गदर्शनासह सर्वसमावेशक सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याने अकादमी प्रारूप बॅडमिंटनपटूंसाठी उपयुक्त ठरले आहे. अनेक युवा बॅडमिंटनपटू अकादमीच्या प्रयत्नांतून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. मात्र अकादमीशी संलग्न नाही अशा परिस्थितीत ‘एकला चलो रे’ वाटचाल करणे खडतर आहे’, असे स्पष्ट मत अव्वल बॅडमिंटनपटू अजय जयरामने व्यक्त केले.

‘अकादमीमुळे सदैव प्रशिक्षक, सहयोगी, समकालीन खेळाडू यांचे सान्निध्य लाभते. मात्र अकादमी नसलेल्या शहरात किंवा गावात राहून आगेकूच करणे अवघड आहे. हैदराबाद येथील गोपीचंद अकादमी तसेच बंगळुरू येथील पदुकोण अकादमी यांच्यासारखे प्रकल्प अन्य देशातही तयार व्हायला हवेत. कारकीर्दीत सुरुवातीला मी पदुकोण अकादमीचा भाग होतो. अकादमीत सराव करण्याचा फायदा मिळतो. आता मी टॉम जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. इतक्या वर्षांनंतरही माझा संघर्ष सुरूच आहे असे अजयने स्पष्ट केले.

‘मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. बॉलीवूडनगरी आहे. मात्र खेळांसाठी सर्वागीण केंद्र नाही. मुंबईत केवळ बॅडमिंटन नव्हे तर विविध खेळात प्रावीण्य असलेले खेळाडू आहेत. मात्र अकादमी स्वरुपाचे मुंबईत काहीच नाही. मुंबईतले बॅडमिंटनपटू प्रगत प्रशिक्षणासाठी हैदराबाद किंवा बंगळुरूला रवाना होतात. पदके, जेतेपदे हा पुढचा टप्पा आहे. लहान वयात मुलांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक असते. मुलांवर अभ्यासात चांगली कामगिरी करण्याचेही दडपण असते. त्यामुळे मुंबईत निवासी स्वरुपाची अकादमी होणे आवश्यक आहे’, असे अजयने सांगितले.

Comments

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages