भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share This
मुंबई दि 2 Dec 2016 – देश बदलत आहे. नोटबंदी करून भ्रष्टाचाराविरूद्ध लढा सुरू झाला आहे. तुम्ही देशाचे वर्तमान आहात. तुमचे प्रत्येक योगदान हे देशातील भ्रष्टाचार समुळ नष्ट करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

मुंबईतील नॅशनल स्पोर्ट्स कल्ब ऑफ इंडिया येथे नाताळ निमीत्त मुंबईतील १३५ शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संदेश देताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमास अमेरीकेतील मियामी येथून डॉ. पास्टर माल्डानाडो हे उपस्थित होते. त्यांनी देशाच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. त्यांच्या बरोबर १३५ शाळेच्या ६ हजार विद्यार्थ्यांनी देशाच्या कल्याणासाठी आणि शांतीसाठी प्रार्थना केली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जग बदलत आहे त्याचप्रमाणे भारत देशही परिवर्तनातून प्रगती करीत आहे. देश चांगल्या परिवर्तनाच्या पर्वात आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे आपण कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जात आहोत. हा क्रांतिकारी बदल आहे. यामुळे काळा पैसा हद्दपार होणार आहे. आपण सर्वांनी संपूर्ण योगदान देऊन एका सैनिकाप्रमाणे भ्रष्टाचार विरुद्धच्या लढाईत योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जगात सर्वात जास्त तरूणांची लोकसंख्या असलेला देश म्हणजे भारत आहे. २०२० मध्ये पश्चिम युरोपचे सर्वसामान्य आयुमानाची सरासरी ही ४१ असणार आहे तर जपानची ४८, पूर्व युरोपची ४४, अमेरीकेची ३५ आणि चायनाची ३७ तर भारत हा एकमेव देश असा असेल ज्यांची सर्वसामान्य आयुमानाची सरासरी २९ असणार आहे. फक्त व्यापार करण्यासाठी मानवी संसाधने पुरविणारा देश नसून, जगाला मानवी मूल्ये आणि सदाचरणासहीत मानवी संसाधने पुरविणारा जगातील एकमेव तरूण देश हा भारत असणार आहे.

स्वच्छ भारत अभियानाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण देशाच्या आणि जगाच्या शांततेसाठी आज प्रार्थना केली. याचा अर्थ मूल्ये आपल्यात रूजली आहेत. आपण जगात शांतता स्थापन करण्याचे कार्य करीत आहोत. बायबलमध्ये शांततेचा संदेश आपल्याला दिला आहे. याच मुल्यांमुळे आपले समाजाला आणि निसर्गाला काही देण लागत. देशाच्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरवात केली असून, आपण आपला समाज आणि निसर्ग स्वच्छ ठेवला पाहीजे. प्रत्येकाने एकतरी झाड लावायला हवे आणि त्याचे संगोपन करायला हवे. देशातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तुमचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य नसून वर्तमान आहेत. असे सांगून त्यांनी नाताळ निमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages