समाधान पाटील मुंबई महापौर चषकाचा मानकरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

समाधान पाटील मुंबई महापौर चषकाचा मानकरी

Share This
मुंबई : मुंबईचा पैलवान समाधान पाटीलने अंतिम फेरीत सर्वाधिक गुणाच्या बळावर कोल्हापूरचा पैलवान संग्राम पाटीलचे आव्हान संपुष्टात आणत अखिल भारतीय मुंबई महापौर चषक कुस्ती स्पर्धेच्या अजिंक्यपदाचा किताब पटकावला. विजेता समाधान पाटीलला एक लाख रुपये इनाम म्हणून देण्यात आले. मुंबई महापौर चषक कुस्ती स्पर्धेमधील कुमार केसरी गटाचे विजेतेपद पुण्याच्या अजय लांडगेने पटकावले.

अखिल भारतीय मुंबई महापौर चषक कुस्ती स्पर्धेच्या मुख्य लढतीमधील अंतिम फेरीत पैलवान समाधान पाटील विरुद्ध पैलवान संग्राम पाटील यामधील सामना एकमेकांचे डावपेच धूळ चारण्यात रंगला. अखेर मुंबईच्या समाधान पाटीलने निर्णायक लढत १0-४ अशा ६ गुणांची आघाडी घेऊन जिंकली. कुमार केसरी मुंबई महापौर चषक कुस्ती गटात पुण्याच्या अजय लांडगेने कोल्हापूरच्या वैभव यादवला सालक डावावर चितपट केले आणि चांदीची गदा व २१000 रुपयांचा पुरस्कार पटकावला.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई महापौर स्नेहल आंबेकर, आमदार कालिदास कोलंबकर, नगरसेविका अलका डोके, नगरसेविका ममता चेंबूरकर, मुंबई शहर तालीम संघाचे कार्याध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष विठ्ठलराव भोसले, महाराष्ट्र केसरी शिवाजीराव पाचपुते, सरचिटणीस प्रकाश तानवडे आदी मंडळींच्या उपस्थितीत पार पडला.

शालेय कुस्तीचे निकाल 
मुले 
३२ किलो : १) शिवम सरोज, २) कैफ खान, ३) मोनू सरोज.
३५ किलो : १) उदित यादव, २) अभिषेक कोरी, ३) राहुल कुचन
३८ किलो : १ ) हिमांशु यादव, २) श्याम सुंदर, ३) अमित यादव
४१ किलो : १) अनुज राणा, २) दीपेश यादव, ३) बिपिन पाल
मुली 
४0 किलो : १) अमृता यादव, २) धनकला कुंवर, ३) शकुंतला राठोड

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages