भारतातील निम्मे सोने केरळमधील तीन प्रमुख कंपन्यांकडे गहाण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भारतातील निम्मे सोने केरळमधील तीन प्रमुख कंपन्यांकडे गहाण

Share This
नवी दिल्ली : भारतातील एकूण सोन्यापैकी निम्मे सोने लोकांनी अडीअडचणींच्या वेळी कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवले असून यापैकी बहुतांश सोने केरळमधील तीन प्रमुख कंपन्यांकडे ठेवलेले आहे. देशात सोन्याच्या तारणावर कर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये मुथुट फायनान्स, मणप्पुरम फायनान्स आणि मुथुट फिनकॉर्प या तीन अग्रगण्य कंपन्या असून भारतातील एकूण ५५८ टन सोन्यापैकी सुमारे ४७ टक्के म्हणजे २६३ टन सोने लोकांनी कर्जासाठी या कंपन्यांकडे गहाण ठेवलेले आहे. यापैकी सवाधिक १५० टन सोने मुथुट फायनान्सकडे आहे तर मणप्पुरम फायनान्सकडे ६५.९ टन व मुथुट फिनकॉर्पकडे ४६.८८ टन सोने आहे.

देशातील सुवर्णसाठ्यांच्या दृष्टीने विचार केल्यास भारताचा जगात ११ वा क्रमांक लागत असला तरी फक्त या तीन कंपन्यांमध्ये लोकांनी तारण म्हणून ठेवलेले सोने सिंगापूर, स्वीडन, आॅस्ट्रेलिया, कुवेत आणि फिनलँड या देशांकडील एकूण सोन्याहून जास्त आहे. जगभरातील सोन्याच्या मागणीपैकी ३० टक्के सोने भारतात विकले जाते. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages