मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे ‘एल’ विभागामध्ये एम. एन. मार्ग, वाडिया इस्टेट कुर्ला (पश्चिम) आणि स्वदेशी मील मार्ग, नागोबा चौक, कुर्ला (पूर्व) येथील कुर्ला दक्षिण या १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर प्रत्येकी ६०० मिलीमीटर व्यासाची नवीन झडप बसविण्याचे काम प्रस्तावित आहे. सदर काम बुधवार, दिनाक १४ डिसेंबर, २०१६ रोजी सकाळी ८ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत (एकूण १६ तास) हाती घेण्यात येणार आहे.
या कामाच्या कालावधीत ‘एल’ विभाग येथील प्रभाग क्रमांक १५४, १५६,१५७, १५८, १५९, १६१, १६२, १६३ आणि १६४ मधील काजूपाडा जलवाहिनी, घासवाला कम्पाऊंड, काले मार्ग, एम. एन. मार्ग, व्हिलेज वॉर्ड, पाईप मार्ग, नौपाडा,गुरूनानक नगर, न्यू मील मार्ग, ए. एच. वाडिया मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, एस.जी. बर्वे मार्ग (पश्चिम), तकियावॉर्ड, स्टेशन रोड, विजय नगर, कसाईवाडा, चुनाभट्टी,नागोबा चौक, व्ही. एन. पुरव मार्ग, बंटर भवन या विभागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
सदर नमूद केलेल्या परिसरामधील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करावा व पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे. तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी दिनांक १५ डिसेंबर,२०१६ पासून ४८ तासांकरीता पाणी गाळून व उकळून प्यावे.