धर्माच्या आचरणात कुणाचाही हस्तक्षेप नको - आ. अबु आझमी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

धर्माच्या आचरणात कुणाचाही हस्तक्षेप नको - आ. अबु आझमी

Share This
नागपूर : इस्लाममध्ये शरियतनुसार आचरण करणाऱ्या मुस्लिम बांधवांना दाढी राखणे, अनिवार्य आहे.भारतीय संविधानानेही धर्मात हस्तक्षेप न करता या देशातील प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा आधिकार बहाल केला आहे. असे असताना धर्माच्या आचरणाबाबत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असे मत समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु आझमी यांनी व्यक्त केले. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने वैमानिकांना दाढी न ठेवण्याबाबत दिलेल्या निर्णयावर विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
या मुद्द्यावर आपले म्हणणे मांडताना ते म्हणाले की, शीख बांधव पगडी बांधतात. त्यांनी पगडी बांधू नये, असे कुणीही म्हणत नाही. मग फक्त मुस्लिम धर्मियांनाच त्यांच्या धार्मिक आचरणाबाबत सल्ले दिले जात असतील तर तो धार्मिक हस्तक्षेप असून अशा पद्धतीने कुणीही धर्मात हस्तक्षेप करू नये असे ते म्हणाले. १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यापासून देशाच्या रक्षणासाठी या देशांच्या सीमांवर मुस्लिम बांधव देखील आपले बलिदान देत आहेत. त्यामुळे फक्त मुस्लिमांना धर्माच्या आधारावर लक्ष्य करण्यात येऊ नये अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages