प्रकाश पाटणकर यांचा मनसेला 'जय महाराष्ट्र' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रकाश पाटणकर यांचा मनसेला 'जय महाराष्ट्र'

Share This
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेच्या बालेकिल्ल्यात हादरा बसण्यास सुरुवात झाली आहे. मनसेचे माजी नगरसेवक आणि दादर विभाग प्रमुख प्रकाश पाटणकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मनसेला 'जय महाराष्ट्र' करत रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पाटणकर यांच्या सेनाप्रवेशामुळे मनसेला दादर विभागात मोठे खिंडार पडले आहे.

उद्धव ठाकरेंचे नेतृत्व चांगले आहे. मनसेमध्ये फक्त बडबड करणार्‍यांना संधी मिळते. मात्र, काम करणार्‍यांना संधी मिळत नसल्याचा आरोप करत पाटणकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. येत्या काही महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. दादर हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. २00९ साली मनसेचे नितीन सरदेसाई याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते तसेच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर भागात सहा नगरसेवक निवडून आणून आपले वर्चस्व निर्माण केले होते. पाटणकर यांच्या सेना प्रवेशानंतर अजून दोन नगरसेवक कार्यकर्त्यांसह बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादरमधील मनसेचा प्रभाव कमी करून येथे पुन्हा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेनेचा असल्याचे बोलले जाते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages