रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकण्याची तयारी करा - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकण्याची तयारी करा - रामदास आठवले

Share This
मुंबई : १0 महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपा शिवसेनेशी महायुती केली जाईल. मात्र केवळ मित्रपक्षांवर अवलंबून न राहता रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकण्याची तयारी करा, असे आवाहन रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत केले.

मित्रपक्षांची शक्ती वाढत असल्याने रिपाइंचीही तशीच शक्ती वाढवण्याची आवश्यकता आहे. या पुढील सर्व निवडणुका पक्ष चिन्हावरच लढल्या पाहिजेत. मागील काही निवडणुकीत मित्रपक्षांच्या चिन्हावर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवल्याचे प्रकार घडले आहेत. यापुढे असे प्रकार होता कामा नये असे आठवले म्हणाले. बैठकीत रिपाइंच्या चिन्हावरच निवडणूक लढवण्याचा ठराव करण्यात आला. या बैठकीत रिपाइंचे राज्य अध्यक्ष भुपेश थुलकर, सरचिटणीस राजा सरवदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, पप्पू कागदे, माजी आमदार अनिल गोंडाणे, तानसेन ननावरे, गौतम सोनावणे, फिरोझअली फारुखी, मन्सूर बलोच, पोपटशेठ घनवट आदी उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages