मुंबई - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात गुजरात येथील मैसाना येथे जाहिर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाचखोरी उघड केली होती. मोदी यांनी सहारा व बिर्ला समूहाकडून २०१३ मध्ये सहा महिन्यात ९ वेळा लाच घेतल्याचे पुरावे सादर केले होते. आयकर विभागाकडे हि याचे सर्व पुरावे आहेत तरीही मोदी यांच्यावर कारवाई झालेली नाही. यावरून सिद्ध होते की नरेंद्र मोदी हे लाचखोर व रिश्वतखोर आहेत. त्यामुळेच आज मुंबईत ५०काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी “हमारा पंतप्रधान रिश्वतखोर है” असे हातावर गोंदवून अनोखे आंदोलन केले. तसेच नोटाबंदी विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तर्फे ६ जानेवारी, २०१६ रोजी संपूर्ण भारतभर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचे आंदोलन होणार आहे. मुंबईत उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाला मुंबई काँग्रेसतर्फे घेराव घालण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, ८ जानेवारी २०१६ रोजी काँग्रेसच्या महिला कार्याकर्त्यातर्फे मुंबईत थाळी लाटणे वाजवून सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करणार आहेत. मुंबईतील सर्व महिला कार्यकर्त्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन प्रथम प्रार्थना करणार आहेत की, या सरकारला चांगली बुद्धी देवो आणि नोटाबंदीचा हा कठोर निर्णय नरेंद्र मोदीने त्वरित मागे घ्यावा. त्यानंतर महालक्ष्मी मंदिराबाहेर काँग्रेसच्या सर्व महिला कार्यकर्त्या थाळी लाटणे वाजवून सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करणार आहेत.
संजय निरुपम पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे शनिवारी शिवस्मारकाच्या जलपुजनासाठी मुंबईत आले असताना आम्ही मुंबई काँग्रेसतर्फे त्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी शांतपणे बांद्रा कुर्ला संकुलात जाणार होतो. आम्ही त्यांना मुख्य दोन प्रश्न विचारणार होतो एक म्हणजे त्यांनी रिश्वत घेतली की नाही ? आणि नोटाबंदीमुळे सामान्य जनतेला होणारा त्रास कधी संपणार आहे ? परंतु हे सरकार आम्हाला प्रश्न विचारू देत नाही व प्रश्नाची उत्तरे हि देत नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी दडपशाही वापरून माझ्यासहित मुंबईतील सुमारे ४०० काँग्रेस कार्यकर्त्यांना घरी किंवा कार्यालयात अटक (नजरबंद) करून ठेवले होते. याचा मी निषेध करतो. यालाच विरोध म्हणून “हमारा पंतप्रधान रिश्वतखोर है” हे आंदोलन केलेले आहे.
नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय भारतीयांवर जबरदस्तीने लादला गेलेला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आयुष्यातून उठला आहे. सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. भारताची अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडलेली आहे. अनेक उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. त्यांनी जनतेकडे ५० दिवस मागितले होते त्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे पण परिस्थिती तशीच्या तशीच आहे, उलट आणखीन बिघडत चाललेली आहे. उद्या ५० दिवसाची मुदत संपली की मुंबई काँग्रेस तर्फे “मिस्ड कॉल आंदोलन” हि सुरु करणार आहोत. ९२२३९०६६६६ या मोबाईल नंबर वर “मिस्ड कॉल” करायचा आहे मग मुंबई काँग्रेस कडून त्यांना कॉल येईल तेव्हा सामान्य जनतेने नोटाबंदीमुळे होणारे त्रास, अडचणी, समस्या आणि बँकांचे चुकीचे व्यवहार याची माहिती द्यायची आहे. या “ मिस्ड कॉल ” आंदोलनाची पुढची रणनीती नंतर सांगण्यात येईल, असे संजय निरुपम म्हणाले.