मुंबई 29 Dec 2016 - सात कादंबरी लेखन करून इंग्रजी साहित्य जगतात लक्षवेधून घेणारे प्रसिध्द कादंबरीकार तुहिन सिन्हा यांची मुंबई भाजपाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी जाहीर केले.
तुहिन ए. सिन्हा यांच्या आज पर्यंत सात कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून बेस्ट सेलर लेखक ठरलेले सिन्हा हे काव्य आणि पटकथा लेखकही आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या कारभाराविषयी आणि त्यांच्या मनात असलेल्या विविध योजना मांडणाऱ्या पुस्तकाचे लेखनही तुहिन ए. सिन्हा यांनी केले. या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. उदय निरगुडकर आणि संदीप साखरे यांनी केला आहे. दरम्यान, आज त्यांची मुंबई भाजपाच्या प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आल्याचे सांगत आमदार अॅड आशिष शेलार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.