मनपा निवडणूकीसाठी नाशकात आंबेडकरी गटांची एेकी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मनपा निवडणूकीसाठी नाशकात आंबेडकरी गटांची एेकी

Share This
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत आंबेडकरी जनतेला सक्षम पर्याय मिळावा. सत्तेत आपला सहभाग वाढावा यासाठी आता शहरातील सर्वच आंबेडकरी पक्ष,गटांनी ऐकी केली आहे. मंगळवारी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होत ही निवडणूक एकत्रित लढण्याचा एकमुखी निर्णय झाला.

गटा-तटात आणि विविध राजकीय पक्षांच्या राजकारणात आडकलेल्या आंबेडकरी जनतेला, बहुजन समाजाला एक सक्षम राजकीय पर्याय समाजाला उपलब्ध व्हावा यासाठी नाशिक जिल्ह्यात एकीची मोट बांधली जात आहे. जिल्ह्यातील सर्वच आंबेडकरी विचारांच्या पक्षांनी एकत्र येत एक विचाराने, एका ध्येयाने आगामी महापालिका निवडणुक लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मंगळवारी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या सर्व आंबेडकरी विचारांचे पक्ष आणि गटांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र लढण्याचा नाराही दिला आहे.

बहुजन मोर्चाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या बहुजन समाजाची एकी ही मतपेटीतही दिसावी. यासाठी योग्य पध्दतीने नियोजन करण्यावर भर दिला जाणार असल्याची चर्चा या बैठकीत झाली. शिवाय के‌वळ राखीव जागांवरच नव्हे तर खुल्या जागांवरही निवडणूका लढवित जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी सुरु केली आहे. *प्राथमिक चर्चा बैठकीस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अण्णासाहेब कटारे, राष्ट्रीय दलित पँथरचे नानासाहेब भालेराव, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे शशीकांत उन्हवणे,भारिपचे दिपचंद दोंदे,राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष जिल्हाध्यक्ष नारायण गायकवाड,बसपाचे रवि धिवरे, भारिपचे जिल्हाध्यक्ष वामनराव गायकवाड, दलित पैंथरचे विलास काळे,सुधाकर काळे,भारतीय बहुजन सेनेचे डॉ.प्रशांत घोडेराव,दलित आदिवासी बहुजन सेनेचे अनिल आठवले, अन्याय अत्याचार विरोधी कृती समिती चे राहुल तुपलोंढे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सिद्धार्थ भालेराव, आर.पी.आय एकतावादी गटाचे आदेश पगारे, बी.आर.एस.पीचे रविंद्र मोकळ, दलित विकास महासंघाचे कैलास तेलोरे, रिपब्लिकन सेनेचे नविन नन्नावरे, संजय घोडके, राजेंद्र गांगुर्डे, राजन भालेराव, बाळासाहेब साळवे, कल्पेश केदारे, पुष्पक जगताप, अँड.दीपक जगताप, मिनाताई भालेराव, बहुजन भिमसेनेचे संजय खरात, रवि जगताप, आतिश कांबळे, पल्लवी सोनवणे, प्रतिक सोनटक्के, जितेश शार्दुल आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध सामाजिक संघटानांनी सहभागी करणार पुढील बैठकीत आघाडीचे नामकरण झाल्यानंतर लागलीच आंबेडकरी विचारांच्याच
विविध सामाजिक आणि सेवाभावी संस्थांनाही या निवडणुकीच्या प्रक्रीयेत
सहभागी करुन घेतले जावे. अशी मागणी उपस्थितांनी केल्यानंतर लागलीच त्यास
सर्वसमंती मिळाली.

बहुजन संघटांनाही निमंत्रित करणारआंबेडकरी विचारांच्या सर्वच पक्षांन, गटांना यात सहभागी करुन घेण्याबरोबरच मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी, चर्मकार,मातंग,भटके विमुक्त,बारा बलूतेदार, ओबीसी अशा सर्वच संघटनांना यात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले जाणार आहे.

जिल्हा परिषदेसाठीही लवकरच बैठकमहापालिकेच्या धर्तीवरच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीही ग्रामीणची लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे. त्र्यंबकेश्वर किंवा दिंडोरीत ही बैठक होण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages