कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे संघ जाहीर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे संघ जाहीर

Share This
मुंबई : गुजरात राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने २१ ते २५ डिसेंबर २0१६ या कालावधीत वडोदरा येथे भरणार्‍या ४३व्या कुमार / कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले. रत्नागिरीच्या शुभम शिंदेकडे मुलांच्या संघाचे, तर ठाण्याच्या माधुरी गवंडीकडे मुलींच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या या संघात पुण्याच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे. मुलांच्या व मुलींच्या संघात पुण्याच्या ३-३ खेळाडूंची वर्णी लागलेली आहे. मुलींच्या संघात मात्र पुण्यापाठोपाठ मुंबई शहराच्या २ मुलींची निवड झालेली आहे. गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. निवड झालेल्या या संघाची यादी रविवारी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी एका पत्रकाद्वारे प्रसारमाध्यमांना दिली.

कुमार गट - शुभम शशिकांत शिंदे (रत्नागिरी)- संघनायक, बबलू बन्सी गिरी-(पुणे), सुरज सचिन महाडिक (सांगली), राहुल रमेश मोहिते (कोल्हापूर), गौरव राजू गंगारे (जळगाव), प्रतीक प्रकाश गावंड (रायगड), सुरज शंकर दुदले (ठाणे), रुपेश रामचंद्र अधिकारी (पालघर), अनिकेत देवेंद्र पेवेकर (मुंबई शहर), आकाश दत्तू आडसुळ (मुंबई उपनगर), अक्षय बाबुराव वढाणो (पुणे), उमेश बाळासाहेब भिलारे (पुणे)

कुमारी गट - माधुरी सुरेश गवंडी (ठाणे) - संघनायिका, २) सोनाली रामचंद्र हेळवी (सातारा), आदिती अशोक जाधव (पुणे), धनश्री सुधीर पोटले (मुंबई शहर), पूजा राजाराम पाटील (पालघर), अंजली संजय मुळे (पुणे), काजल शंकर जाधव (पुणे), प्रगती रमेश कणसे (मुंबई उपनगर), तेजश्री श्रीकृष्ण सारंग (मुंबई शहर), समरिन शौकत बुरोडकर (रत्नागिरी), देवयानी दर्शन म्हात्रे (रायगड), ऑलिस्का पिटर आल्मेडा (सिंधुदुर्ग)

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages