मुंबई शूटिंगबॉल संघाची निवड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

२० डिसेंबर २०१६

मुंबई शूटिंगबॉल संघाची निवड

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने गं. द. आंबेकर स्मृती शूटिंग बॉल स्पर्धा ना. म. जोशी मार्गावरील ललित कला भवनच्या मैदानावर पार पडल्या. मुंबई शूटिंग बॉल असोसिएशनच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेतून चाचणी परीक्षेमधून राष्ट्रीय संघामध्ये खेळण्यासाठी मुंबई संघातील वरिष्ठ व कनिष्ठ संघ निवडण्यात आले.

खेळाडूंच्या नावांची घोषणा असोसिएशनचे सेक्रेटरी दीपक सावंत यांनी ललित कला भवन येथे जाहीर केली. निवड झालेल्या खेळाडूंचे लवकरच शिबीर घेण्यात येईल. त्यामधून राष्ट्रीय खेळासाठी मुंबई शूटिंग बॉल संघाची अंतिम निवड करण्यात येईल, असे दीपक सावंत यांनी घोषणा करताना सांगितले. वरील राष्ट्रीय निवड झालेल्या खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून अशोक चव्हाण व रतन रावराणे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

वरिष्ठ टीम - अनिकेत म्हात्रे, सचिन बलसाने, सुयोग पाटील, विजय जाधव, श्रीकांत वाईकर, सुमित पाटील, राजेश भोसले, समीर मोकल, महेश कदम, हरिश्‍चंद्र पाटील, भावनेश वाघेला, अभय माळी, अभिजीत भोसले, प्रसाद पाटील, संकेत पाठारे, अभिजीत म्हात्रे, संत्यत्र गावंड, गोपाळ पोकळे, योगेश बाबल, अरुण माने.

कनिष्ठ टीम - कौस्तुभ भगत, प्रथमेश मोकल, स्वप्निल मोकल, अनिकेत मोकल, ऋषिकेश म्हात्रे, सौरभ पाटील, नवीन पाटील, पुजेश पाटील.

Post Bottom Ad

JPN NEWS