स्वतंत्र मतदार संघासाठी आझाद मैदानात उपोषण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वतंत्र मतदार संघासाठी आझाद मैदानात उपोषण

Share This

मुंबई / प्रतिनिधी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार एससी एसटी सारख्या मागासवर्गिय समाज घटकांना स्वतंत्र मतदार संघ उपलब्ध करून द्यावेत या मागणीसाठी मागासवर्गीय स्वतंत्र मतदार संघ संघर्ष समितीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात 20 वे उपोषण सुरु करण्यात आले असल्याची माहिती सुरेश गायकवाड यांनी दिली.

मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचार बंद करावेत, एट्रोसिटी कायदा अधिक कड़क करावा, बौद्ध एससी एसटी ओबीसी धनगर मुस्लिम यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा किंवा इतर गरजू लोकांना आरक्षण द्यावे, बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या विविध संकल्पना व इतर प्रलंबित मागण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने 20 व्या वेळा उपोषण सुरु केले आहे. या बाबत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, यूनो, केंद्रीय सामजिक न्याय मंत्री रामदास आठवले, राज्यपाल, मुख्यमंत्री, इत्यादी मान्यवराना निवेदन देण्यात आले आहे. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहित आणि मुख्यमंत्री भेट देत नाहित तो पर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages