मुंबई / प्रतिनिधी - नोटबंदी नंतर मुंबई महापालिकेचे जकातीचे उत्पन्न घटले होते. यानंतर केलेल्या विविध उपाययोजनांमुळे जकातीच्या उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती उपायुक्त कर व निर्धारण बी. जी. पवार यांनी दिली.
मुंबई महापालिकेला जे उत्पन्न मिळते त्यामध्ये जकातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा असतो. जकातीच्या माध्यमातून पालिकेला दरवर्षाला 7 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. केंद्र सरकारने जुन्या 500 व 1000 च्या नोट बंद केल्यावर जकातीचे उत्पन्न 36 टक्क्यापर्यंत कमी झाले होते. यानंतर पालिकेच्या जकात विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली. जकात चोरीला आळा घालण्यात आला. यामुळे जकातीच्या उत्पन्नामध्ये 11.5 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल 2016 पासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 5 हजार 200 कोटी इतकी जकात वसूली झाली आहे. आर्थिक वर्ष मार्चला संपणार असल्याने यावर्षी जकात वसूली चांगली होईल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.