मुंबईतील 25 पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2017

मुंबईतील 25 पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

मुंबई, दि. 6 : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील पंचवीस पोलीस ठाण्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर 410 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय गृह विभागाने आज निर्गमित केला आहे.
पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेशित केले आहे. त्यानुसार राज्य शासनाने मुंबईमधील कुलाबा, एम.आर.ए., व्ही.पी. मार्ग,दा.भ. मार्ग, वडाळा, नागपाडा, वरळी, काळा चौकी,आर.ए.के. मार्ग, माहिम, कुर्ला, चेंबूर, नेहरुनगर, घाटकोपर,विक्रोळी, वाकोला, बांद्रा-कुर्ला, सांताक्रुझ, जुहू, पवई,एम.आय.डी.सी., मालाड, मालवणी, दिंडोशी, दहिसर या पंचवीस पोलीस ठाण्यांमध्ये हे कॅमेरे प्रायोगिक तत्वावर बसविण्यात येणार आहेत.

या पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे दालन, पोलीस स्थानकाचा संपूर्ण परिसर व सर्व कक्षांसाठी (महिला कक्ष व विश्रांती कक्ष वगळून) एकूण 410 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास व त्यासाठी येणाऱ्या 2 कोटी 75 लाख रुपये एवढ्या खर्चास या आदेशान्वये प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय गृह विभागाने निर्गमित केला आहे.

Post Bottom Ad