निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पालिका कर्मचा-यांना सुट्टी नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पालिका कर्मचा-यांना सुट्टी नाही

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या फेब्रुवारी 2017 ला होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचा-यांची आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या दैनंदिन कामकाज व नागरी सेवा सुविधांवर परिणाम होऊ नये यादृष्टीने सर्व अधिकारी, कर्मचा-यांना जानेवारी 2017 ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तत्सम किंवा अर्जित रजा मंजूर करू नय़े असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.

आगामी निवडणूकी दरम्यान मुंबई महापालिका क्षेत्रात साडे आठ हजार मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात येतात. या प्रत्येक मतदान केंद्रांवर किमान ५ इतक्या संख्येने कर्मचा-यांची आवश्यकता असते. याव्यतिरिक्त आकस्मिक गरज लक्षात घेऊन किमान १० टक्के राखीव कर्मचारीही निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असतात. त्यानुसार निवडणूकीसाठी साधारणपणे ५० हजार एवढ्या संख्येतील कर्मचा-यांची आवश्यकता असते. यापैकी बहुतांश कर्मचारी महापालिकेच्या अखत्यारितील असतात. महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर व नागरी सेवा सुविधांवर या बाबीचा परिणाम होऊ नये, यादृष्टीने व्यवस्थापकीय उपाययोजना म्हणून महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांना जानेवारी पासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रजा मंजूर न करण्याचे परिपत्रकही प्रशासनाने काढले असल्याचे एका अधिका-यांने सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages