११ तासांत हरवलेल्या वस्तू परदेशी नागरिकाला मिळवून दिल्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 January 2017

११ तासांत हरवलेल्या वस्तू परदेशी नागरिकाला मिळवून दिल्या

मुंबई : पासपोर्ट, कॅमेरा, रोख रक्कम अशा मौल्यवान वस्तू रिक्षात हरवल्याची तक्रार परदेशी नागरिकाने अंधेरी पोलिसांत करताच पोलिसांनी अथक परिश्रम करून ११ तासांत हरवलेल्या वस्तू परदेशी नागरिकाला मिळवून दिल्या. पोलिसांच्या या कामगिरीने आनंदीत झालेल्या परदेशी नागरिकाने पोलिसांना प्रशस्तीपत्र लिहून दिले. 'अतिथी देवो भव' या ब्रीद वाक्याला धरून अंधेरी पोलिसांनी परदेशी नागरिकाला तत्काळ मदतीचा हात देऊन केलेल्या मदतीमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा परदेशी नागरिकांमध्येदेखील उजळ होण्यास मदत झाली आहे.

अज्रेंटिना देशाचा नागरिक असलेल्या ऑगस्टिन कॉन्सलिस (२१) या विद्यार्थ्याने गुरुवारी अंधेरी पोलीस ठाण्यात येऊन कळवले की, तो त्याच्या मित्रासह चकाल्याहून अंधेरी रेल्वे स्थानकाकडे रिक्षाने येत असताना दोन कॅमेरे, १ हजार अमेरिकन डॉलर्स, पासपोर्ट आणि काही कागदपत्रे विसरल्याचे सांगितले. ऑगस्टिन याचा पासपोर्ट, व्हिसाचे कागदपत्रे हरवल्याने तो हतबल झाला होता. या प्रकरणाची माहिती चौकशी करताना अंधेरी पोलीस ठाण्याचे वपोनि. पंडित थोरात, पोनि. राजीव चव्हाण, सपोनि. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. पर्यटनादरम्यान ऑगस्टिन याने केलेल्या कॅमेर्‍यातील चित्रणात पोलिसांना तो प्रवास करत असलेला क्रमांक दिसून आला. त्या क्रमांकावरून रिक्षामालकाचा मालाड येथील पत्ता मिळाला. मात्र, पोलिसांनी मालाड येथे धाव घेतली असता तो पत्ता चुकीचा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी अंधेरीच्या आरटीओ कार्यालयात धाव घेऊन रिक्षामालकाचा विलेपार्ले येथील पत्ता मिळवला. मात्र, रिक्षाचालक घरी नव्हता. त्याच्याकडे मोबाईल नसल्याने त्याच्याशी संपर्क करता येत नव्हता. रिक्षाचालकाच्या शोध पोलीस दिवसभर करत होते. अखेर अच्छेलाल गुप्ता (५८) हा रिक्षाचालक रात्री ११ वाजता पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून ऑगस्टिन याच्या विसरलेल्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेऊन त्या ऑगस्टिनला परत करण्यात आल्या.

Post Bottom Ad