मुंबई : मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांना मुंबई महापालिकेने २४ तासात ५ कोटी ४८ लाख रुपये भरण्याची नोटीस दिली आहे. अन्यथा शहर विद्रुपीकरणाचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या १४ व्या वर्षी रविवारी १५ जानेवारीला होणार्या स्पर्धेत देश-विदेशातील ४२३७९ धावपटू निरनिराळय़ा गटांत मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहेत.
मॅरेथॉनमधील सर्वात वेगवान वेळ नोंदवणारा इथिओपियाचा आयेल अँबशेरो (२:0४:२३ सेकंद) आणि दोन वेळा मुंबई मॅरेथॉनमध्ये विजेता ठरलेली डिंक नेश मेकाश हिच्यासह केनिया व इथिओपियाचे अनेक धावपटू यंदाच्या मॅरेथॉनचे प्रमुख आकर्षण असतील. ऑलिम्पिकपटू खेतारामसह एम. डी. युनीस आणि एलम सिंग तसेच महिलांमध्ये ज्योती गवते, मोनिका राऊत आणि मोनिका आथरे या भारतीय धावपटूंकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. या स्पध्रेसाठी ३ लाख ८४ हजार डॉलर्सची पारितोषिके लावण्यात आली आहेत.
हौशी धावपटूंसाठीच्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे ५-४0 मिनिटांनी सुरुवात होईल. त्यानंतर ठीक ७-२0 वाजता मुख्य मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होईल. या दोन्ही स्पर्धांची सुरुवात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून होईल आणि त्याच ठिकाणी शेवटही होईल. अर्ध मॅरेथॉन वरळी डेअरीपासून सकाळी ५.४0ला सुरू होईल आणि सीएसटीला संपेल. मुंबईतील पोलिसांसाठी पोलीस चषक ठेवण्यात आला असून या स्पर्धेलाही अर्धमॅरेथॉन प्रमाणेच आणि वेळेनुसार वरळी डेअरीपासून सुरुवात होईल. या गटात प्रत्येकी दोन धावपटू असलेले चाळीस संघ सहभागी होतील. विजेत्या संघाला फिरता चषक देण्यात येईल. चॅम्पियन्स आणि अपंगांसाठीच्या स्पर्धेला सीएसटीपासून सकाळी ७.३५ला सुरुवात होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठीची शर्यत सकाळी ८ वाजता सीएसटीपासून सुरू होईल. या दोन्ही स्पर्धा मेट्रो सिनेमासमोरील तीन क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोर आटोपतील.
स्पर्धेच्या आयोजकांनी ही स्पर्धा दरवर्षीपेक्षा अधिक यशस्वी होण्यासाठी धावपटूंची विशेष काळजी घेतली आहे. संपूर्ण ४२.१९५ किमी. धावण्याच्या मार्गावर १ लाख ४0 हजार लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध असेल. याशिवाय निरनिराळय़ा ठिकाणी १२ वैद्यकीय केंद्रे असतील. यापैकी दोन सीएसटी येथे असतील. धावपटूंना थंडावा मिळावा म्हणून अकरा ठिकाणी गार पाण्याचे स्पंज पुरवले जाणार आहेत.
१२ वैद्यकीय केंद्रे
गेली बारा वर्षे मुंबई मॅरेथॉनशी संबंधित असणार्या एशियन हार्ट इन्स्टिट्युटने यंदाही धावपटूंच्या तब्येतीची पुरेपूर काळजी घेतली आहे. स्पर्धेदरम्यान कोणत्याही धावपटूंला दुखापत किंवा तब्येतीचा त्रास होऊ नये म्हणून स्पर्धेच्या मार्गावर एकूण बारा वैद्यकीय केंद्रे उभारण्यात येतील. सहाशे स्वयंसेवक इन्स्टिट्युटच्या डॉक्टर्सना साहाय्य करतील.
२ स्पेशल ट्रेन
रविवारी मुंबईत होणार्या सॅण्डर्ड चॅर्टर्ड मुंबई मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने २ स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मेन लाईनवर कल्याण ते सीएसटी आणि हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसटी या मार्गावर स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी उपनगरातून येणार्या नागरिकांना सकाळी लवकर प्रवास करता येणार आहे. कल्याण-सीएसटी स्पेशल ट्रेन पहाटे ३ वाजता सुटणार असून सीएसटीला पहाटे ४ वाजून ३0 मिनिटांनी पोहचणार आहे. तर पनवेल-सीएसटी स्पेशल ट्रेन पहाटे ३ वाजून १0 मिनिटांनी सुटणार असून सीएसटीला पहाटे ४ वाजून ३0 मिनिटांनी पोहोचणार आहे. या दोन्ही स्पेशल ट्रेन सर्व स्थानकांवर थांबा घेणार आहेत. दरम्यान, सीएसटीसाठी कल्याणहून पहाटे ४ वाजून ४१ मिनिटांनी सुटणारी आणि वाशीहून पहाटे ४ वाजता सुटणार्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
बेस्टच्या वाहतुकीमध्ये तात्पुरते बदलमुंबई मॅरेथॉनसाठी बेस्टच्या बसेसच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे. काही बसमार्गांची वाहतूक तात्पुरती रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. रविवारी दुपारी १२.३0 वाजेपर्यंत बसमार्ग क्रमांक १0५, १0६, १0८, ११२, १२३, १२५, १३२, १३३, १५५ आणि १५७ या बसमार्गांचे प्रवर्तन तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मंत्रालय, मेयो रोड ( हुतात्मा चौक), बाबुलनाथ, वाळकेश्वर, कमला नेहरू पार्क, वरळी डेअरी आणि ग्रँटरोड स्थानक (प.) या बसचौक्या देखील दुपारी १२.३0 वाजेपर्यंत तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र दुपारी १२.३0 नंतर सर्व बसमार्ग तसेच बसचौक्या पूर्ववत कार्यरत होणार आहेत. याशिवाय काही बसेसच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. भेंडी बाजार, महात्मा फुले मार्केट-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून कुलाबा नेव्हीनगरकडे जाणारे मार्ग सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, वाडी बंदर, पी. डिमेलो रोड आणि शहीद भगतसिंग मार्गाने चालवण्यात येणार आहेत. तसेच पंडित पलुस्कर चौक, येथून प्र. ठाकरे चौक व माहिमकडे प्रवर्तित होणारे बसमार्ग वसंतराव नाईक चौक, वत्सलाबाई देसाई चौक, महालक्ष्मी रेसकोर्स, ई-मोझेस मार्ग, जी. एम. भोसले मार्ग, कॉ. पी. के. कुरणे चौक, पांडुरंग बुधकर मार्ग, एन. एम. जोशी मार्ग व गोखले मार्गे चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी या बसमार्गाच्या वाहतुकीमध्ये तात्पुरत्या बदलांची नोंद घ्यावी आणि आपला प्रवास सुरू करावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.

अर्ध मॅरेथॉन धावपटूंसाठी विशेष बसेस
अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या धावपटूंसाठी संयोजकांनी सेंट्रल रेल्वेवरील करी रोड स्टेशनपासून तर पश्चिम रेल्वेवरील लोअर परेलपासून विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या धावपटूंकडे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचे क्रमांक असलेले बिब्ज असतील त्यांनाच या बसेसमध्ये बसता येईल आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. पहाटे ३-३0 ते पहाटे ५ पर्यंत ही बस सेवा उपलब्ध असेल.