मुंबई काँग्रेसतर्फे महापालिका निवडणुकीसाठी उत्तर भारतीय एजेंडा... - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई काँग्रेसतर्फे महापालिका निवडणुकीसाठी उत्तर भारतीय एजेंडा...

Share This
मुंबई / प्रतिनिधी - आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उत्तर भारतीयांचा एजेंडा ठरविण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे उद्या मंगळवार, ३ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५.०० वाजता माणिकलाल रामलीला मैदान, घाटकोपर पश्चिम, मुंबई येथे ‘‘उत्तर भारतीय संमेलन’’ आयोजित करण्यात आले आहे. 
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून खासदार राज बब्बर, खासदार संजय सिंह, वाराणसीचे आमदार अजय राय आणि जौनपूरचे आमदार नदीम जावेद तसेच माजी मंत्री चंद्रकांत त्रिपाठीं व आमदार अरिफ नसीम खान उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. या प्रसंगी लोक कलाकार मोहन राठोड आणि सुरेश शुक्ला हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages