६० दिवसात किती काळे धन जमा झाले याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला उत्तर द्यावे असे उद्गार मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी काढले. नोटबंदीच्या निर्णयाविरोधात मुंबई काँग्रेसने हजारो कार्यकर्त्यांसमवेत आज खेरवाडी जंक्शन, बांद्रा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की लोकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जबरदस्ती लादला आहे. त्यामध्ये सामान्य लोकांना जो त्रास झाला. जे लोक या नोटबंदीच्या निर्णयाचे बाली गेलेत. या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला आज मुंबई काँग्रेसतर्फे आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे. या नोटबंदीमुले ४५ लाख पेक्षा जास्त लोक बेरोजगार झाले आहेत. १३८ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. भारत जगातील एक असा पहिला देश आहे, जिथे लोक बँकेत जमा असलेले स्वतःचे पैसे काढू शकत नाही. ५० दिवस थांबा, सर्व सुरळीत होईल. अशी घोषणा नोटबंदीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आज नोटबंदी होऊन ६० दिवस झाले आहेत. पण अजूनही देशातील स्थिती नियंत्रणात आलेली नाही. गरीब व सामान्य जनता यात भरडली जात आहे. त्यातच भाजपा सरकार आणि रिसर्व बँक नवनवीन निर्णय जनतेवर लादत आहेत. या ६० दिवसात भाजप सरकारने आयकर विभागाला वेठीस धरून काळ्या धनविरोधात धाडसत्र सुरु केले. या धाडसत्रामध्ये भाजपच्या ३७ नेत्यांकडे तब्बल ६४९ करोड रुपये सापडले. हा सर्व पैसे २००० च्या नोटांच्या स्वरूपात होते. लोकांना ATM मधून साधे १० हजार रुपये काढता येत नाही. तर या नेत्यांकडे एवढे पैसे कुठून आले. ४५ लाख करोड रुपयांचे चलन या सरकारने क्षणात बाद केले. मग ६० दिवसात नवीन नोटा का छापल्या नाहीत. असा आमचा नरेंद्र मोदींना प्रश्न आहे. आमचे काही प्रश्न आहेत त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारने त्वरित जनतेसमोर द्यावीत. या मागण्यांचे एक निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह देणार आहोत.
आमची मागणी आहे नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे की नोटबंदी नंतर किती काळे धन पकडले गेले आणि कोणा-कोणाकडून पकडले गेले त्यांची नवे जाहीर करावीत? नोटबंदीमुळे देशाचे किती आर्थिक नुकसान झाले आहे व किती रोजगार गेले? नोटबंदी नंतर भ्रष्टाचार किती प्रमाणात संपला? आज नोटबंदीमुळे ज्या लोकांचे जीव गेले आहेत त्यांना नुकसानभरपाई का दिली नाही? ज्या नोटा बाद केल्या आहेत त्या लवकरात लवकर बदलण्यासाठी नवीन नोटांची छपाई का वाढवली नाही? नोटबंदीच्या निर्णयामुळे आतापर्यंत १३८ लोकांचा मृत्यू झाला. जो लोकांना त्रास झाला त्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी यांनी जनतेची जाहीरपणे माफी मागावी. असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.
सदर मोर्चात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत माजी खासदार प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, खासदार हुसेन दलवाई, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुभाष चोप्रा, संजय झा, बिहारचे आमदार अजित शर्मा, कर्नाटकचे आमदार रिजवान, आमदार असलम शेख, नसिम खान, अमिन पटेल, भाई जगताप, वर्षाताई गायकवाड, जनार्दन चांदुरकर, माजी आमदार कृपाशंकर सिंह, सुरेश शेट्टी, बाबा सिद्धिकी, अशोक जाधव, राजहंस सिंह, युसुफ अब्राहनी, चंद्रकांत हंडोरे, बलदेव खोसा, चरणसिंग सपरा, मनपा विरोधी पक्षनेता प्रविण छेडा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील, संदेश कोंडविलकर, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे, मुंबई युथ काँग्रेस अध्यक्ष गणेश यादव, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष निजामुद्दीन राईन, सर्वश्री जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, ब्लॉक अध्यक्ष आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.