१३ जानेवारीला कांदिवली स्पोर्टस ग्राउंड येथे ऑलम्पिक खेळाडू निवड चाचणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 January 2017

१३ जानेवारीला कांदिवली स्पोर्टस ग्राउंड येथे ऑलम्पिक खेळाडू निवड चाचणी

मुंबई - ऑलम्पिक खेळाडू निवड चाचणी दिनांक १३ जानेवारी २०१७ ला कांदिवली स्पोर्टस ग्राउंड येथे संपन्न होत आहे. सन २०२०-२०२४ करिता १००, २००, ४०० मीटर ट्रॅक धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी सदर चाचणी २९ राज्यामधील १०३ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

ज्यामध्ये जिल्हा स्तर झोन स्तर व राष्ट्रीय असे तीन टप्पे आहेत. गेल रफ्तार हया सिझन-२ मध्ये देशातील ७०३ जिल्हे, २९ राज्य व ७ संघ राज्यांमध्ये घेऊन दुर्गम भागातील, दुर्लक्षित क्षेत्रांमधून प्रतिभावंत खेळाडूंना निवडण्याचा मानस आहे असे नॅशनल युवा को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने चिता मिस्त्री, विवेक सुर्वे, हिरण्य मोहंती यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

या वेळी बोलताना मोहंती म्हणाले, या स्पर्धा घेत असताना आम्ही खेळाडूंना योग्य आहार देण्याची व्यव्स्था करत आहोत. सरकारनेही खेळाडूंच्या प्रश्नावर गंभीर भूमिका घेतली पाहिजे. तरच देशाचे नाव जगभर होईल. ग्रामीण भागात आज अनेक जागतिक दर्जाचे खेळाडु आहेत, मात्र त्यांना योग्य न्याय मिळत नाही, असा आरोप त्यांनी या वेळी केला.

निवड समिती मध्ये प्रमुख उत्तरदायित्व प्रसिद्ध एथलीटस, पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेती पी.टी. उषाजी, जाणकार एथलीट श्रीराम सिंग, १६ वर्ष नॅशनल रेकॉर्ड स्थापन्न ठेवणारी रचिता मिस्त्री, अनुराधा बिजवाल व अर्जुन पुरस्कार आणि सुवर्णरत्न पुरस्कारांनी सन्मानित महाराष्ट्राची कविता राऊत असून या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हा कार्यक्रम रुचिता मिस्त्री (नॅशनल लेव्हल खेळाडू), सतीश मराठे (नॅशनल युवा को ऑपरेटीव्ह सोसायटी संपादक), मोहंती (नॅशनल युवा को ऑपरेटीव्ह सोसायटी संपादक), हरीश आचार्य (मुंबई समन्वयक), विवेक सुर्वे (कार्यक्रम प्रमुख) हयाच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Post Bottom Ad