मुंबईत शेलार, सोमय्यांचा स्वबळाचा नारा फेल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 January 2017

मुंबईत शेलार, सोमय्यांचा स्वबळाचा नारा फेल

मुंबई (प्रतिनिधी) - देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरूवात झाली आहे मुंबईतील भाजप नेत्यांनी शिवसेनेविरोधात लढण्याची घोषणा यापूर्वी केली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युतीबाबत प्रस्तावाच्या विचार करत आहेत. यामुळेच स्थानिक नेत्यांचा रोष मुख्यमंत्र्यांना पत्करावा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप खासदार किरीट सोम्मया, आमदार आशिष शेलार, प्रवक्ते माधव भंडारी आदीसह असंख्य कार्यकर्त्यांनी स्वबळाची भाषा केली आहे, असे असतानाही मुख्यमंत्र्यांच्या युतीबाबत हट्टाने मुंबई भाजपमध्ये संभ्रांवस्था निर्माण झाली आहे. मात्र, शिवसेना- भाजपची युती झाल्यास शेलार, सोमय्यांचा स्वबळाचा नारा फेल ठरण्याची शक्यता आहे.
लोकसभा, विधानसभेत पहिल्या क्रमांकावर पटकाल्यानंतर भाजप मुंबई महापालिकेवर झेंडा रोवण्याचे प्रयत्न करत आहे. यावेळी महापालिका सत्तेत मित्रपक्ष शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी अनेक कामांबाबत आक्षेप घेतला. तर भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनीही अनेकवेळा शिवसेनेला आव्हान देत वैर पत्कारुन घेतले. किरीट सोमय्या यांना शिवसेनाविरोधी वक्तव्याचा चांगलाच प्रसाद मिळाला होता. माधव भंडारी यांनी भाजपच्या मुखपत्रात शिवसेनेविरोधात लेख लिहील्याने मोठा गदारोळ झाला होता. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत प्रस्ताव मांडला आहे. भाजपचे तीन आणि शिवसेनेचे तीन नेते यावर निर्णय घेत आहेत. युतीबाबत शेलार, सोमय्या अनुकूल आहेत की नाही, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण मुख्यमंत्री प्रस्तावाबाबत विचार करत असताना लालबाग येथे झालेल्या भाजप मेळाव्यात शेलार यांनी शिवसेनेला आव्हान दिले. त्यामुळे भाजपचे मुंबई अध्यक्ष सेनेविरोधात आणि मुख्यमंत्री युतीच्या बाजूने असे अनोखे चित्र भाजपमध्ये पहायला मिळत आहे. मुंबईत शिवसेनेच्या साथीने भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. शिवसेनेचे मुंबईत प्राबळ्य आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वबळावर लढल्यास भाजपसमोर शिवसेनेचे आव्हान राहील आणि मत विभाजनाचा फायदा काँग्रेसला होऊ शकेल. हे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आल्यानेच मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील भाजप नेत्यांकडे कानडोळा करत शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव ठेवल्याचे बोलले जात आहे.

Post Bottom Ad