दलित ख्रिश्चनांना आरक्षण देणार - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दलित ख्रिश्चनांना आरक्षण देणार - रामदास आठवले

Share This
चेन्नई दि 6 - धर्मान्तर केलेल्या दलित ख्रिश्चनांना आरक्षण मिळावे या मागणीचा भारत सरकार सकारात्मक विचार करेल .त्यांना स्वतंत्र 2 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी चेन्नई येथील वेल्लापुरम येथे झालेल्या दलित ख्रिश्चन मेळाव्यात दिले यावेळी दलित ख्रिश्चन मेळाव्याचे संयोजक गॅरीक जॉन तसेच रिपाइंचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष फादर सुसाई ;आदिकेशवन; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते
ख्रिस्ती धर्मात जातीव्यवस्थे च्या नावे भेदभाव नाही तरीही ख्रिस्ती धर्मात धर्मांतरीत झालेल्या दलितांवर अन्याय होत असल्याचे निवेदन येथील दलित ख्रिश्चनांनीं दिले याबाबत आपण स्वतः लक्ष घालून दलित ख्रिश्चनांना न्याय देणार असून ख्रिस्ती बांधवांनी जर असा भेदभाव होत असेल तर तो थांबविण्याचे प्रबोधन करावे असे आवाहन नामदार रामदास आठवले यांनी केले

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने सर्वांनाच न्यायहक्क समान दिले आहेत अल्पसंख्य असलेल्या ख्रिस्तीबांधवांना भारतीय संविधानानेच संरक्षण दिले आहे त्यामुळे ख्रिस्ती बांधवांनी संविधानातील समतेचा विचार आदर्श मानून ख्रिस्ती धर्मातील दलितांना न्याय व समान हक्क द्यावा असे आवाहन नामदार रामदास आठवले यांनी केले

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages