बसपाची १00 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बसपाची १00 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Share This
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 'दलित-मुस्लिम-ब्राह्मण' असा सोशल इंजिनिअरिंगचा नवा फॉर्म्यूला वापरणार्‍या बसपने १00 उमेदवारांची दुसरी सूची शुक्रवारी जाहीर केली. आतापर्यंत बसपने २00 उमेदवार घोषित केले. त्यात प्रामुख्याने ५८ मुस्लिम उमेदवार आहेत. २00७ च्या धर्तीवर या निवडणुकीत मुस्लिम कार्डचा वापर करून राज्याची सत्ता पादाक्रांत करण्याचा बसपचा मनसुबा आहे.

यूपीमध्ये मुस्लिम लोकसंख्या २0 टक्के आहे. त्या प्रमाणात बसपने मुस्लिमांना उमेदवारी दिली. जवळपास १२५ ठिकाणी मुस्लिम मते निर्णायक आहेत. त्यामुळे या समुदायाची बसप विशेष काळजी घेत आहे. दुसर्‍या यादीत २७ दलित आणि २२ मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. प्रत्येक वेळी बसप सुप्रिमो मायावती भाजपवर तुटून पडत आहेत. कारण भाजपला त्या मुख्य शत्रू मानतात. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी मुस्लिमांनी समाजवादी पक्ष व काँग्रेसला मते न देता बसपला एकगठ्ठा कौल देऊन विजयी करावे, असे आवाहन त्या करतात. राज्यात बसपने मुस्लिमांना ९७ ठिकाणी उमेदवारी दिली. दलितांना ८७, ओबीसींना १0६ तर सवर्णांना ११३ जागांवर प्रतिनिधित्व दिले. विरोधक बसपला जातीयवादी संबोधतात; परंतु आमच्या पक्षाने समाजातील सर्वच घटकांना स्थान दिल्याचे सांगत विरोधकांचा आरोप मायावतींनी खोडून काढला. दरम्यान, २0१२ च्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळाल्याने सपला स्पष्ट बहुमत मिळाले. या पार्श्‍वभूमीवर एकजूट मुस्लिम कोणतेही राजकीय समीकरण तोडू शकते, असे जाणकारांना वाटते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages