भाजपच्या तालावर नाचणाऱ्या गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यावा – संजय निरुपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 January 2017

भाजपच्या तालावर नाचणाऱ्या गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यावा – संजय निरुपम


Displaying 01.JPG

मुंबई / प्रतिनिधी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशावर लादलेल्या अन्यायकारक नोटबंदी विरोधात रिझर्व बँकेच्या देशातील ३५ कार्यालयावर आज काँग्रेसतर्फे घेराव घालण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई  काँग्रेसतर्फे आज मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मुंबईतील मुख्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला होता.


सदर प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, हा मोर्चा काढायची गरज का लागली? ज्या दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशावर नोटबंदीचा अन्यायकारक निर्णय लादला त्या दिवसापासून आजपर्यंत ६९ वेळा RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपले निर्णय बदलले आहेत. रोज त्यांच्याकडून नवीन घोषणा केली जायची. त्यांनी हे सर्व निर्णय भाजपा सरकारच्या सांगण्यावरून घेतले आहेत. RBI ला उर्जित पटेल यांनी भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातील बाहुले बनवले आहे. यामुळे RBI भाजपा सरकार यांची चमचेगिरी करत आहे. RBI चे माजी गव्हर्नर आणि माजी अधिकारी यांनी देखील या गोष्टीची निंदा केली आहे. गेल्या ७० वर्षात RBI ने कमावलेले नाव, स्वायत्तता उर्जित पटेल यांनी धुळीला मिळवली आहे. म्हणून असे बिनकामाच्या आणि भाजप सरकारच्या तालावर नाचणाऱ्या उर्जित पटेल यांनी आपल्या RBI गव्हर्नर पदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे. असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण मोर्चाला उद्धेशून म्हणाले की, रिझर्व बँकेचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या सांगण्यावरून घेणाऱ्या उर्जित पटेल यांना रिझर्व बँक म्हणजे RSS ची शाखा वाटली का? RBI ही केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली चालणारी संस्था नाही. तिला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि हे निर्णय बदलत नाहीत. RBI ला भाजपा सरकारच्या तालावर नाचणारे बाहुले बनवणाऱ्या आणि RBI ची स्वायत्तता धुळीला मिळवणाऱ्या उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.

सदर मोर्चात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल, सुभाष चोप्रा, संजय झा, माजी खासदार प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, आमदार नारायणराव राणे, वर्षाताई गायकवाड, नसिम खान, अमिन पटेल, नितेश राणे, कालिदास कोळंबकर, भाई जगताप, जनार्दन चांदुरकर, माजी आमदार कृपाशंकर सिंह, सुरेश शेट्टी, हर्षवर्धन पाटील, बाबा सिद्धिकी, अशोक जाधव, चंद्रकांत हंडोरे, चरणसिंग सपरा, शाम सावंत, राजहंस सिंह, युसुफ अब्राहनी, बलदेव खोसा, मनपा विरोधी पक्षनेता प्रविण छेडा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील, संदेश कोंडविलकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, राजू वाघमारे, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे, मुंबई युथ काँग्रेस अध्यक्ष गणेश यादव, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, ब्लॉक अध्यक्ष आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

या मोर्चानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपल्या शिष्टमंडळासोबत रिझर्व बँकेचे रिजनल डायरेक्टर मुरली राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय लोकांना आपले पैसे बँकेतून काढता यावेत व नोटबंदीमुळे सामान्य माणसाला झालेल्या नुकसानाची जबाबदारी स्वीकारून RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन त्यांना दिले

Post Bottom Ad