मुंबई / अजेयकुमार जाधव - नगरसेवक निधी मधून बांधण्यात आलेले वाचनालय मुंबई महापालिका आणि राजकीय नेत्यांच्या ताब्यात न दिल्याने कोणतीही नोटिस न देता तोड्ण्यात आल्याची तक्रार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श मानव समितीचे अध्यक्ष शिवाजी कांबळे यांनी पालिका आयुक्तांकड़े केली आहे.
मुंबई महापालिकेच्या एल विभागाच्या अखत्यारीत नेहरू नगर येथील भीम लाईट सोसायटीच्या समोर तत्कालीन नगरसेवक कमलाकर शांताराम नाईक यांनी 26 एप्रिल 2011 रोजी नगरसेवक निधीमधून बांधण्यात आले होते. हे वाचनालय नगरसेवक निधीमधून बांधून झाल्यावर नगरसेवक नाईक यांनी सहाय्यक आयुक्त एल विभाग यांना 26 जुलै 2011 ला पत्र देवून हे वाचनालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श मानव समितीच्या स्वाधीन करावे म्हणून ना हरकत पत्र दिले आहे.
सदर वाचनालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श मानव समितीच्या ताब्यात द्यावे, वाचनालय चालवायला मिळावे म्हणून शिवाजी इंगले यांनी पालिकेच्या एल विभागाकड़े पत्रव्यवहार केला पालिकेच्या जागेवरील बांधकाम वाचनालय, दवाखाना, व्यायामशाळा संस्थेकड़े देखभालीसाठी देण्याचा प्रस्ताव (57/ 2010-11) गटनेता व सुधार समितीकड़े प्रलंबित असल्याचे सहाय्यक अभियंता परिरक्षण यांनी कळविले आहे. अशी परिस्थिती असताना तत्कालीन नगरसेवकाने ही जागा ताब्यात देण्यासाठी इंगले यांच्याकडे मागणी केली. यासाठी पालिका अधिकाऱ्यानी इंगले याना दमबाजी ही केली आहे.
दम देवूनही इंगले भीत नसल्याचे पाहून पालिका अधिकाऱ्यानी 26 दिसेंबरला वाचनालयाला टाळा लावला. याबाबत एल विभागाचे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त याना पत्र दिले असता पालिकेने कोणतीही नोटिस किंवा सूचना न देता 11 जानेवारी 2017 ला तोडून टाकले आहे. या वाचनालयातुन आधार कार्ड वाटप, शासकीय व महापालिकेच्या योजना नागरीकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले जात होते यामुले हे वाचनालय तोड्न्यात आल्याचा आरोप इंगले यांनी केला असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकड़े केली आहे.