ठाणे - महापालिकेतील सर्व विभागतील कंत्राटी कामगारांना २४ फेब्रुवारी २०१५ रोजीचे शासकीय परिपत्रकानुसार हुद्याप्रमाणे किमान वेतन लागू करावे, महाराष्ट्र शासनाने कंत्राटी कामगारांना सुधारित वेतन देण्याचा निर्णय २४ फेब्रुवारी २०१५ रोजी घेतला असून तेंव्हापासून सुधारीत वेतनातील फरकाची थकीत रक्कम सुमारे ३६ कोटी कंत्राटी कामगाराना अदा करण्यात यावे, वेतन व सुविधा मागितल्या म्हणून कामावरून बेकायदेशीरपणे कमी केलेले सर्व खात्यातील कंत्राटी कामगाराना तात्काळ कामावर घ्यावे. या व अन्य न्याय्य मागण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर २ जानेवारी २०१७ रोजी लाक्षणिक उपोषण केले होते.
जगदीश खैरालिया, कंत्राटी कामगार- दशरथ राठोड, प्राची परब, शैलेश राठोड, नंदकुमार म्हात्रे, भास्कर शिगवण, मनोज पडवळ, किरण जगताप, सुधीर कानकोसे, अनिल तूपे, मंगेश खंडागळे यानी दिवसभराचे लाक्षणिक उपोषणकरून आपल्या मागण्यासाठी सत्याग्रह केला. पाठिबा देण्यासाठी घंटागाडी, रस्ते सफाई ड्रेनेज विभागातील कंत्राटी सफाई कामगार घराघरातू कचरा गोळा करणार्या महिला कामगर मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. श्रमिक जनता संघाचे चिटणीस जगदीश खैरालिया यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण आंदोलन करण्यात आले. यात कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अांदोलनाला पाठींबा देण्यासाठी मानवी हक्क अभियानचे दत्ता आवाड, स्वराज अभियानचे उन्मेष बागवे, संजीव साने, राष्ट्र सेवादलाचे विश्वास भोईर, श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस एड. एन एम शिवकर , एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे लिलेश्वर बंसोड सहभागी झाले होते. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचे निर्धार करण्यात आले.