मुंबई: दि. 3 जानेवारी 2017 -
ओबीसी मंत्रालय सध्या माझ्याकडे आहे, पण लवकरच या मंत्रालयासाठी स्वतंत्र मंत्री देण्यात येईल. तसेच ओबीसी महामंडळाला मोठ्या प्रमाणत निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशा मत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी आज येथे केल्या.
ओबीसी समाजाला स्वतंत मंत्रालय दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार आणि धन्यवाद सभा आयोजित केली होती. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या संल्पनेतून झालेल्या या सभेचे निमंत्रक आमदार मनीषा चौधरी आणि योगेश सागर होते. तर सभेला राज्यमंत्री विद्या ठाकूर, खासदार पूनम महाजन, आमदार संजय कुटे, पराग अळवणी, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, आमित साटम, मंदा म्हात्रे यांच्यासह सर्व ओबीसी सामाज्याचे प्रमुख नेते उपस्थित होते. वांद्रे पूर्व येथील इंडियन एज्यूकेशन सोसायटीच्या मैदानात हि सभा झाली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले कि, ओबीसी समाजाला सर्व संधी मिळाल्या पाहिजेत. समाजाकरिता विविध विकासाच्या योजना तयार झाल्या पाहिजेत. म्हणून देशातील पहिलं राज्य कि जिथे ओबीसी समाजासाठी वेगळं मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सध्या ओबीसी मंत्रालयाचा कारभार माझ्याकडे आहे, पण यासठी एक स्वतंत्र मंत्री पण देणार. मागासवर्गीयांच्या योजनाचा निधी कुठे जातो हे शोधण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली. ८०० ते ९०० कोटी रुपयांचा अफरातफर होत असल्याचा अंदाज आहे. हि कारवाई सुरू झाल्यावर 200 कोटी कोणी क्लेम केले नाहीत. ओबीसींच्या नावाखाली लोक पैसे खात होते. अनेक योजना संस्थाचालकांसाठी चालतात किंवा कंत्राटदारांसाठी चालतात असे चीत्र होते. आपल्याला ठेकेदारांना पोसायच नाही, लोकांच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे म्हणून सरकार पारदशी कारभार करते आहे. ओबीसी महामंडळ कमकुवत असून त्याला सक्षम करण्यात येईल व आवश्यक निधीही देण्यात येईल. काही लोक समाज्यात तेड निर्माण करत आहेत, अश्या लोकांनी सामाज्यासाठी एक तरी चांगले काम केले का हे एकदा तपासून पहावे. सरकारला सर्वच समाज घटकांना न्याय द्यायचा आहे, विकास विषमतेवर नाही तर समानतेवर करायचा आहे, असे ते म्हणाले