मुंबई : घाटकोपर पूर्व, पंतनगर येथील श्री गणेश संस्थानच्या कला विभागातर्फे १५ जानेवारी रोजी मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
श्री गणेश संस्थान हे विभागात सामाजिक जाणीव असलेले संस्थान असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, म्हणून विविध उपक्रम राबवत असते. त्यातीलच पहिला उपक्रम म्हणून रविवार, १५ जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धा आयोजिक केली आहे. ही स्पर्धा चार गटांत घेण्यात येणार असून पहिल्या गटात पहिली ते दुसरीची मुले असतील, दुसर्या गटात तिसरी ते चौथीची मुले, तिसर्या गटात पाचवी ते सातवीची मुले असतील. या स्पर्धांमध्ये विभागातील शालेय विद्यार्थी यात भाग घेतात व विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. याचदिवशी संस्थानच्या शैक्षणिक विभागातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सराव परीक्षेचे यंदाचे ४ थे वर्ष असून घाटकोपर व आसपासच्या विभागातील शालेय विद्यार्थी यात भाग घेतात, ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना अंतिम शालान्त परीक्षेत होतो.