बुलडाणा - ऐतिहासिक सिंदखेड राजा नगरी येथे जिजाऊंचा ४१९ वा जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी जिजाऊंना मानाचा मुजरा करण्यासाठी महाराष्ट्र राज्यासह देश-विदेशातून लाखो मर्द मावळे व जिजाऊंच्या लेकी उपस्थित होत्या. तोफांच्या भडीमाराने थरालेली ऐतिहासिक जाधव घरान्यांची 'राजधानी' व लाखो जिजाऊ प्रेमींची मने..ओसांडून वाहत असल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले.
जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे ११ जानेवारी रोजी राजवाड्यात ४१९ मशाली पेटवून जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी कतरुत्व व नेतृत्व याचे आदर्श उदाहरण असलेल्या जिजाऊं मॉसाहेबांच्या जन्माचा मुकसाक्षीदार असलेला लखोजीराजे जाधवांचा वाडा अक्षरक्ष: उजळून निघाला. जिजाऊ जन्मसोहळय़ाची हि तेजस्वी सरुवात ठरली. आज गुरुवारी पार पडलेल्या प्रत्येक कार्यक्रमात या मशालींचा लखलखाट दिसत असल्याचा भास उपस्थित लाखो जिजाऊ भक्तांना झाला. गारठवणार्या थंडीत सकाळी ६ च्या सुमारास सुर्यदेवतेच्या साक्षिने राजवाड्यातील जिजाऊंच्या जन्मस्थळी महापूजा करण्यात आली. तोफांच्या गगणभेदी आतिषबाजीने राजमातेला सलामी देण्यात आली. या नंतर जन्मोत्सवाच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी साडेसहा वाजता राजवाडा येथून जिजाऊ सृष्टीपर्यंत काढण्यात आलेली वारकरी दिंडी लक्षवेधी व यंदाच्या सोहळय़ाचे एक वैशिष्ट्य ठरली. सकाळी ९ वाजता पार पडलेल्या ध्वजारोहणानंतर महाराष्ट्रातील नामवंत शाहीरांच्या हातातील डफांनी ताल धरला! या सोहळय़ाचे मुख्य संयोजक, प्रेरणा आणि प्रमुख आकर्षण असलेले मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर यांच्या तडाखेबंद व रोखठोक मार्गदर्शनाने यंदाच्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळय़ाची तेवढय़ाच थाटात सांगता झाली.
खासदारकी मागायला गेलो नव्हतोमला सरकारने दिलेली खासदारकी त्यांनी सन्मानाने दिली आहे. आपण खासदारकी मागायला गेलो नव्हतो, असे यावेळी बोलताना खा. छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले. ज्या घराण्याचे आपण वारसदार आहोत त्या घराण्याला दिलेला हा सन्मान असल्याने तो नाकारता आला नाही, असेही त्यांनी सांगितले. मिळालेली ही खासदारकी बहुजनांची असून बहुजनांच्या हितासाठी व शिवरायांचे गड, किल्ले यांचे जतन आणि संरक्षण करण्याचे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांचे स्मारक जमिनीवर व्हावे - खेडेकरमहाराजांचे भव्य स्मारक होत असल्याची बाब अभिमानास्पद आहे; परंतु हे स्मारक समुद्रात न होता जमिनीवर व्हावे, अशी मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी जिजाऊ जन्मोत्सवात बोलताना केली. सोबतच राज्यभर मराठा क्रांती मूकमोर्चांमुळे काहींनी समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रय▪केला. त्यामुळे सामाजिक समतेसाठी मराठय़ांनी दोन पाऊले पुढे यावे, असे आवाहनदेखील यावेळी त्यांनी केले.