मुंबई- १८-(प्रतिनिधी )-ऍट्रॉसिटीसह विविध मागण्यांसाठी मुंबईत सर्व आयोजकांनी मिळून एकाच सर्वसमावेशक मोर्चा काढावा यासाठी मुंबईतील आंबेडकरी तरुण उद्यापासून (१९ जानेवारी ) मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसत आहेत . काडी संघटनांच्या दुराग्रहामुळे जिल्हावार दोन मोर्चे निघाले असले तरी मुंबईसारख्या महत्वाच्या ठिकाणी विभाजनाचे चित्र उभे करून आपापसातील दुहीचे चित्र बहुजन समाजासमोर दाखवू नये असे आवाहन या उपोषणकर्त्या तरुणांनी केले आहे .
ऍट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी, मागासवर्गीयांवरील अत्याचारांचे खटले विशेष न्यायालयात चालविणे , ओबीसींच्या आरक्षणाला धक्का ना लावणे महारवतनी जमिनींवरील अतिक्रमण काढणे अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला आरक्षण देणे भटके विमुक्तांच्या हक्कांचे संरक्षण करणे यासह विविध विषयांवर संविधान गौरव महामोर्चा कृती समितीने २४ डिसेम्बर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर महामोर्चाचे आयोजन केले होते, सदर मोर्चाची जोरदार पूर्वतयारी करण्यात आली होती , मात्र त्याच दिवशी संविधान सन्मान मोर्चा आणखी एका मोर्च्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे दुहीचे चित्र दिसू नये म्हणून महामोर्चा कृती समितीने संबंधितांशी चर्चा केली होती मात्र संविधान सन्मान मोर्च्याच्या आयोजकानी न जुमानल्यामुळे करिती समितीने आपला मोर्चा पुढे ढकलला होता .
दरम्यान बहुजन क्रांती मोर्चा आणि बहुजन हक्क संवर्धन मोर्चा यांनी अनुक्रमे २१ जानेवारी आणि १४ मार्च असे मुंबईत दोन वेगवेगळे मोर्चे मुंबईत घोषित केले आहेत या आयोजकांनीं एकच मोर्चा काढावा यासाठी संविधान गौरव बहुजन महामोर्चा कृती समितीच्या तरुणांनी सलग दोन्ही मोर्चा आयोजकांसोबत चर्चा केल्या मात्र हे दोघेही एक मोर्चा आयोजित करू शकले नाहीत अशी खंत उपोषणकर्त्या तरुणांनी व्यक्त केली आहे .
दरम्यान बहुजन समाजाचा मुंबईत एकाच मोर्चा निघावा यासाठी जनतेसमोर जाण्याचा निर्णय संविधान गौरव महामोर्चा समितीच्या तरुणांनी घेतला असून यासाठी उद्या सकाळी १० वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणासाठी बसत आहेत . आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत ऍट्रॉसिटी कायद्याला विरोध करणाऱ्या पक्षा ऐवजी समर्थन असलेल्या आंबेडकरी विचारांच्या लोकांना सहकार्य करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे