मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिका निवडणुकीचे एकीकडे शिवसेना -भाजप युतीसाठी चर्चेचे गु-हाळ सुरू असताना दुसरीकडे भाजपसोबत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाच्या उमेदवारांनी पालिका निवडणूकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक न लढायचे नाही अशी भूमिका घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी रिपाइं उमेद्वारांना भाजपचे निवडणूक चिन्ह देण्याचे प्रकार घडले. त्यामुळे यावेळी सावध झालेल्या रिपाइं (ए ) ने असे प्रकार पुन्हा घडू नयेत असे विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा चे प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे- पाटील यांना दिले असल्याची माहिती रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
रिपाइं भाजप सोबत युती मध्ये असला तरी स्वतंत्र अस्तित्व असणारा पक्ष आहे. रिपाइंलाही पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी रिपाइं उमेद्वारांना भाजपचे निवडणूक चिन्ह देण्याचे प्रकार घडले. त्यामुळे यावेळी सावध होत पालिका निवडणुकीत भाजपचे चिन्ह न घेता निवडणूक लढवण्याचे उमेदवारांनी ठरवले आहे. तसेच रिपाइं उमेद्वारांसमोर भाजप चे बंडखोर उमेदवार उभे राहु नयेत बंडखोरांना भाजपने निवडणूक चिन्ह आणि ए बी फॉर्म देऊ नये असेही या पत्रात नमूद करण्यात आले असल्याचेही पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, तानसेन ननावरे काकासाहेब खंबाळकर डी एम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.