विद्यार्थ्यांनी वाहतूकीच्या नियमांबाबत जनजागृती करावी - दत्ता पडसळगीकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 January 2017

विद्यार्थ्यांनी वाहतूकीच्या नियमांबाबत जनजागृती करावी - दत्ता पडसळगीकर

Image result for mantralaya

मुंबई, दि. 17 : वाहतूक सुरक्षिततेबाबत नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी विद्यार्थ्यांनी वाहतूकीच्या नियमाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी आज येथे व्यक्त केले. ‘28 व्या रस्ता सुरक्षा पंधरवडा-2017’ च्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा दल अंतिम संचलन स्पर्धा नायगाव येथील पोलीस कवायत मैदानात झाली. त्यावेळी ते बोलत होते. वाहतूक पोलीस सहआयुक्त मिलींद भारंबे यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. विविध शाळांचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.



स्पर्धेत बोरिवली येथील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलला प्रथम, कांदिवली येथील स्वामी विवेकानंद स्कूलला द्वितीय आणि एससीएस गण शाळेला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. ‘बेस्ट वर्क इन एज्युकेशन ब्रॅंच 2016-17’ हा पुरस्कार सहाय्यक फौजदार श्री. केदार आणि सहाय्यक फौजदार श्री. माने यांना देण्यात आला.

Post Bottom Ad