शिवसेनेच्या ‘‘डिड यू नो’’ होर्डिंगबाजीला काँग्रेसतर्फे सोशल मीडियावरून जोरदार उत्तर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 January 2017

शिवसेनेच्या ‘‘डिड यू नो’’ होर्डिंगबाजीला काँग्रेसतर्फे सोशल मीडियावरून जोरदार उत्तर

मुंबई / प्रतिनिधी - शिवसेना व भाजपाची गेली २२ वर्षे मुंबई महानगपालिकेत सत्ता असून पालिकेत अनेक भ्रष्टाचार व घोटाळे झालेले आहेत. शिवसेना व भाजप मुंबईकरांना मूलभूत सुविधा देण्यात असफल व अपयशी ठरलेले आहेत. तरी हि शिवसेनेकडून संपूर्ण मुंबईभर ‘‘डिड यू नो’’ ची होर्डिंगबाजी सुरु केलेली आहे. शिवसेना भाजपाची असफलता दाखविण्यासाठी "डिड यू नो" ला मुंबई काँग्रेसतर्फे सोशल मीडियावरून शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा कार्यक्रम आजपासून सुरु केलेला आहे. ट्विटर, फेसबुक, व्हाट्स अँप या माध्यमातून ‘‘डिड यू नो’’ ला मुंबई काँग्रेस उत्तर देणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.
ते पुढे म्हणाले कि मुंबई काँग्रेसच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट वरून मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना व भाजपाच्या सर्व घोटाळ्यांची माहिती देण्यात येणार आहे. ‘‘डिड यू नो’’ रस्ते घोटाळा, खड्डे घोटाळा, रस्ते दुरुस्ती घोटाळा, टॅबलेट घोटाळा, नाले सफाई घोटाळा, डम्पिंग ग्राउंड घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची माहिती सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत.

Post Bottom Ad