मनसेची गांधीगीरी - उद्यानाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2017

मनसेची गांधीगीरी - उद्यानाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश

मुंबई / प्रतिनिधी - आपल्या खळखट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चक्क गांधीगिरी करत एम पूर्व विभाग कार्यालयासमोर उपोषण करून मुंबई महापालिकेला उद्यानाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास लावली आहे.

मुंबई महापालिकेच्या देवनार येथील बाळासाहेब ठाकरे उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या तसेच देखभालीच्या कामात कंत्राटदाराने दिड कोटी रुपयांचा चुना लावला. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष सचीन ससाने यांनी माहिती अधीकाराअंतर्गत मिळवलेल्या माहीतीच्या आधारावर सदर बाब उघड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घोटाळ्याची चौकशी करुन दोषी कंत्राटदार, मनपा आधीकारी व लोकप्रतिनिधीं यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा. एम पूर्व विभागातील सर्व उद्यानांच्या व स्मशानभूमीच्या कामासाठी झालेल्या खर्चाची चौकशी व्हावी या मागण्यासाठी मनसे उपाध्यक्ष सतीश नारकर, विभाग अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अॅड. विजय रावराणे, संजय बाबर, सचिन ससाने, प्रशांत मारे, शिवाजी सुपेकर व मनसे पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (4 जानेवारी) एम पूर्व विभाग कार्यालयाबाहेर उपोषण केले. खळखट्याक साठी प्रसिद्ध असलेल्या मनसेने गांधीगीरीच्या मार्गाने केलेल्या उपोषणासमोर महापालिका प्रशासन नमले. एम पुर्वचे सहाय्यक आयुक्तांनी मैदानाच्या डागडुजीचे व चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले. त्यानंतर गुरूवारी शिरीष सांवत, मनसे पदाधिकारी व मनसैनिकांच्या उपस्थितीत उद्यानाच्या डागडुजीच्या कामाची सुरुवात करण्यात आली.

Post Bottom Ad