सूक्ष्म, लघु उद्योग घटकांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 January 2017

सूक्ष्म, लघु उद्योग घटकांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 7 : मुंबई उपनगरामध्ये उत्पादन करणाऱ्या पात्र उद्योग घटकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने उद्योग विभागाकडून जिल्हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी दि. 13 जानेवारी 2017 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई प्राधिकरण विभागाचे उद्योग उपसंचालक यांनी केले आहे. 
सूक्ष्म व लघु उद्योग घटकांच्या उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी व स्पर्धात्मक क्षमता वृध्दीसाठी सूक्ष्म व लघु उद्योग घटकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने उद्योग विभागाकडून दरवर्षी जिल्हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यासाठी 13 जानेवारी 2017 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.

यामध्ये अर्जदार उद्योग घटकांने सुक्ष्म अथवा लघु उद्योग उत्पादक घटक आवेदन पत्र भाग-2 (EM part-II)/ उद्योग आधर मेमोरॅण्‍डम प्राप्त केलेले असावे व घटकाचे उत्पादन तीन वर्षापासुन अथवा त्यापूर्वी झालेले असावे.आवेदन पत्रामध्ये नमूद असलेल्या उत्पादीत बाबीसाठी घटक मागील तीन वर्षे सलग उत्पादनामध्ये असावा. यापूर्वी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय अथवा जिल्हा पुरस्कार प्राप्त झालेले घटक या पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाहीत. तरी या पुरस्कारासाठी विहीत नमुन्यामध्ये अर्ज करण्याचे आवाहन सूक्ष्म व लघु उत्पादक घटकांना करण्यात येत आहे.

याकरीता अर्जाचा नमुना व इतर माहितीसाठी उद्योग सहसंचालक (मुंप्रावि) यांचे कार्यालय, औद्योगिक रसायन प्रयोगशाळा इमारत, टाटानगरसमोर चुनाभट्टी (पूर्व), मुंबई-400022 या पत्त्यावर संपर्क साधावा. दूरध्वनी क्र.022-24055999/24056199 इ-मेलdidicmumbai@gmail.com

Post Bottom Ad