'सीआरझेड' परिसर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महापालिकेची कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'सीआरझेड' परिसर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महापालिकेची कारवाई

Share This
वर्सेावा परिसरात १३८ अनधिकृत इमारतींवर महापालिकेची कारवाई - मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेच्या 'के पश्चिम' विभागात वर्सेावा परिसरातील जिल्हाधिका-यांच्या अखत्यारित असणा-या जमिनीवरील आणि सागरी नियमन क्षेत्रामधील (CRZ) १३८ अतिक्रमणे तोडण्यात आली आहेत. परिमंडळ – ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनात या अनधिकृत इमारतींवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार मुंबई पोलीस दल व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने महापालिकेच्या पथकाने आतापर्यंत १३८ अतिक्रमणे तोडली आहेत, अशी माहिती 'के / पश्चिम' विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
वर्सेावा परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल नगरजवळ असणा-या सिद्धार्थ नगर परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असणा-या सागरी नियमन क्षेत्रातील जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होती. ही अतिक्रमणे हटविण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विनंतीनुसार महापालिकेद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस दलाचे ३० पोलीस कर्मचारी, महापालिकेचे २२ कामगार – कर्मचारी - अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे ७ कर्मचारी / अधिकारी सदर ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित होते. तसेच या ही कारवाईसाठी ३ जेसीबी, २ लॉरी व २ डंपर देखील वापरण्यात आले, अशीही माहिती सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी दिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages