महापालिका रुग्णालयातील संपकरी डॉक्टरांना बडतर्फीच्या नोटिसा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिका रुग्णालयातील संपकरी डॉक्टरांना बडतर्फीच्या नोटिसा

Share This


मुंबई / प्रतिनिधी - धुळे येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणी नंतर मुंबई महापालिकेच्या शिव रुग्णालयात एका डॉक्टरला मारहाणीचा प्रकार घडल्यावर महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन सुरु केले आहे. या रजा आंदोलनात सहभागी झालेल्या डॉक्टरांना मुंबई महापालिकेने बडतर्फ करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत.

शिव रुग्णालयातील डॉक्टरांबरोबर त्यांच्या मागण्याबाबत सोमवारी पालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संपकरी डॉक्टरांनी त्वरित सुरक्षा देण्याची मागणी केली. डॉक्टरांना काम करताना सुरक्षेसाठी शस्त्रधारी पोलिस द्यावेत, आलाराम लावावेत, पेशंट बरोबर वार्डमध्ये 2 नातेवाईक, इमरजंसी वार्डमध्ये 3 नातेवाईक येतील याची दक्षता घ्यावी. रुग्णाबरोबर मोठा घोळका येणार नाही यासाठी प्रशासनाने कारवाई करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या. आता पर्यंत दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने आम्ही सामुदायीक रजेवर जात असल्याचे डॉ. नंदीश व शारन सोनवने यांनी दिली होती.

याबाबत बोलताना डॉक्टरांनी केलेल्या मागण्यापैकी रुग्णाबरोबर दोन पास व घोळका येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांशी बोलणे झाले असून शनिवार पर्यंत 400 व 1 एप्रिल पासून आणखी 300 असे एकूण 700 शस्त्रधारी पोलिस नियुक्त केले जाणार आहेत, दुप्पट खर्च करून हे पोलिस दिले जाणार आहेत असे महाडेश्वर यांनी सांगितले होते. डॉक्टरांनी सामूहिक रजा घेतल्याअसल्या तरी हा संपाचा प्रकार आहे. रुग्णांचे हाल होत आहेत याची दखल या डॉक्टरांनी घ्यायला हवी. रुग्णांचे हाल होऊ नए म्हणून डॉक्टरांनी आपला संप मागे घ्यावा अन्यथा डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महापौर महाडेश्वर यांनी दिला होता.

महापौरांच्या व पालिका प्रशासनाच्या इशाऱ्यानंतरही डॉक्टर सुट्टीवर होते. मुंबई महापालिका प्रशासनाने मंगळवारी कारणे दाखवा नोटिस बजावाल्या होत्या. नोटिस बजावल्यानंतरही डॉक्टर सेवेत रुजू न झाल्याने रुग्णांचे हाल होऊ लागले आहे. रुग्णाना उपचार मिळत नसल्याने तसेच इमरजंसी सेवे व्यतिरिक्त रुग्णालायाच्या इतर सर्व सेवा कोलमडल्याने अखेर संपकरी डॉक्टरांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान बडतर्फीच्या नोटिसा बजावल्यानंतर कुर्ला भाभा रुग्णालयातील काही डॉक्टर कामावर रुजू झाल्याची माहिती पालिका सभागृह नेते यशवंत जाधव यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages