जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी धरणे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 April 2017

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी धरणे आंदोलन

मुंबई (जेपीएन न्यूज) - जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत असल्याने महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाच्या वतीने बुधवारी (५ एप्रिल) आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही, तर पावसाळी अधिवेशनापासून हजारो आदिवासी ठाकूर जमात बांधव बेमुदत उपोषण करतील, असा इशारा संघटनेचे संघटक अध्यक्ष आत्माराम ठाकूर यांनी दिला.

सोबत ज्या कुटुंबात वैधता प्रमाणपत्र नसेल, त्यात त्यांनी दिलेले सन १९५० पूर्वीचे पुरावे ग्राह्य धरून सकारात्मक चौकशी करून किंवा जवळच्या नातेवाईकाच्या वैधतेचा आधार घेऊन वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ठाकूर जमातीच्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल केला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार, समित्यांनी ठाकूर समाजाला जात वैधता प्रमाणपत्र तत्काळ अदा करण्याची मागणी मंडळाने केली आहे.

Post Bottom Ad