बालविवाह रोखण्यासाठी आता वयाचा दाखला अनिवार्य होणार ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बालविवाह रोखण्यासाठी आता वयाचा दाखला अनिवार्य होणार !

Share This


नवी दिल्ली : देशात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम-२00६ ची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे आता विवाहबंधनात अडकणार्‍या नवदाम्पत्यांना लवकरच वयाचा दाखला अनिवार्य केला जाणार आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या संदर्भात राज्य सरकारांना निर्देश देत १८ पेक्षा कमी वयाची मुलगी आणि २१ पेक्षा कमी वयाच्या मुलाचा विवाह रोखण्यासाठी वय प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक केले आहे.


'एनसीपीसीआर'चे सदस्य यशवंत जैन म्हणाले की, बालविवाह प्रतिबंधक कायद्याची स्वातंत्र्याच्या ७0 वर्षांनंतर अंमलबजावणी न होणे ही निश्‍चितच चिंतेची बाब आहे. त्यामुळे विवाह करताना वयाचा दाखला आता अत्यावश्यक करण्यात येत आहे. पुरोहित किंवा विवाह लावणारा धर्मगुरू अथवा घरातील कोणत्याही जबाबदार व्यक्तीने लग्नाच्या वेळी दारक - दारिकांच्या वयाचे प्रमाणपत्र दाखवले पाहिजे. त्यामुळे बालविवाह प्रथा मोडीत निघण्यास मदत होईल, असे जैन यांनी नमूद केले. या मुद्दय़ावर सविस्तर चर्चा करण्यासाठी 'एनसीपीसीआर'ने गेल्या २५ एप्रिल रोजी एका बैठकीचे आयोजन केले होते. यात कायदा व न्याय मंत्रालय, विधी आयोग आणि काही कायदेविषयक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. तत्पूर्वी गत फेब्रुवारी महिन्यात तेलंगणाची राजधानी हैदराबाद व आंध्रमधील विजयवाड्यात 'एनसीपीसीआर'ने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आंध्रात पंचायतींमध्ये विवाह नोंदणी होत आहे. या वेळी वयाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे बालविवाह रोखण्यात यश मिळत असल्याचे जैन यांनी ठासून सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages