महानगरपालिकांतील कर्मचाऱ्यांची अन्य महानगरपालिकेत बदली करण्याबाबत अधिनियमात सुधारणा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2017

महानगरपालिकांतील कर्मचाऱ्यांची अन्य महानगरपालिकेत बदली करण्याबाबत अधिनियमात सुधारणा - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 7 : महानगरपालिकांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची अन्य महानगरपालिकेत बदली करण्याबाबत अधिनियमात आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.
महापालिकेतील कर्मचाऱ्यांची बदली इतरत्र करता येत नसल्याने वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहून गैरकामांना गती मिळत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य गिरीशचंद्र व्यास यांनी मांडली होती. या लक्षवेधीस उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करावयाची असल्यास महापालिकेच्या नियमात व कायद्यांमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव तयार करण्यात येईल. त्याचबरोबर, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत राहून गैरकारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली त्याच विभागातील दुसऱ्या महानगरपालिकेत करण्याबाबतची प्रक्रिया तपासण्यात येऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

Post Bottom Ad