डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामांची सुरूवात १४ एप्रिलपूर्वी करा - आमदार प्रकाश गजभिये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 April 2017

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामांची सुरूवात १४ एप्रिलपूर्वी करा - आमदार प्रकाश गजभिये

मुंबई - इंदूमिलच्या जागेवर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक लवकरच तयार होणार, अश्या फसव्या घोषणा करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक ११ नोव्हेंबर २०१५ ला भुमीपूजन झाले, अडीच वर्षाच्या काळात आंबेडकरी जनतेला निव्वळ आश्वासनांच्या पावसात ओलेचिंब करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी दादरस्थित इंदुमिलची जमीन अधिकृतरित्या महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात हस्तांतरित करण्याचे त्रुट्यारहित असतांना कागदोपत्री दर्शविले, अश्या प्रकारे आंबेडकरी जनतेची सत्तेत आल्यापासून भाजप चक्क फसवणूक करीत आहे, असा घणाघती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केला.


डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीपूर्वी (१४ एप्रिल २०१७) स्मारकाच्या कामाला सुरूवात होईल अशी घोषणा अनेकदा केली, परंतु आज इंदूमिल दादर येथे प्रत्यक्ष जाउन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार, जेष्ठ नेेते माजी मंत्री जयंत पाटील, विधानसभा विरोधीपक्ष नेेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रकाश गजभिये, रिपाई नेतेे प्रा. जोगेंद्र कवाडे, सह बहुसंख्य आमदारांनी पाहणी केली असता, तेथे कोणत्याही प्रकारे कामाला सुरूवात झाली नसल्याचे दिसून आले. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पाण्याने धुऊन स्वच्छ केला व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली. “तीन वर्षात स्मारकाचं काही काम न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.” “माफी मागा, माफी मागा, महाराष्ट्राची माफी मागा,” अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या. आंबडेकर जयंतीही जवळ आली आहे. तरीही बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. राज्य सरकार स्मारकाच्या कामाबाबत वेळकाढूपणा करतंय, दुर्लक्ष करतंय. सरकारला गांभीर्यच नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती संपूर्ण देशभरात मोठया उत्साहाने साजरी करीत असतांना. आंबेडकरी जनेतेचे श्रध्दास्थान असलेली चैत्यभूमी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक निर्माणाची संकल्पना आम्हीच केल्याचा गवगवा भाजपाने केला. आंबेडकरी जनेतेच्या मतांवर डोळा ठेवून निरनिराळया घोषणा भाजप सरकार करीत आहे, निदान त्यांनी आंबेडकरी जनेतेची फसवणूक करू नका असे आवाहन आमदार प्रकाश गजभिये यांनी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भुमीपूजन केले तेव्हा येत्या १४ एप्रिलपूर्वी स्मारकाच्या कामाला सुरूवात होईल, अशी घोषणा केली. जाहिरातबाज, घोषणाबाज भाजपच्या घोषणेला दोन वर्षे उलटल्यानंतर केंद्रिय वस्त्रोउद्योग मंत्री इराणी यानी इंदू मिलची जागा हस्तांतरीत करीत असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी १४ एप्रिलपूर्वी स्मारकाच्या कामाला सुरूवात होईल, अशी घोषणा केली. या घोषणेने संपूर्ण राज्यात आनंदोत्सव आंबेडकरी जनतेने केला, पण आंबेडकरी जनतेला फसविणाऱ्या भाजप सरकारने त्यांची निराशा केली. येत्या १४ एप्रिलपूर्वी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामांची सुरूवात करा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने तिव्र आंदोेलन करण्याचा ईशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी दिला.

Post Bottom Ad