मुंबई ( प्रतिनिधी ) – कुर्ला सिएसटी येथे मिठी नदीलगत असलेले भंगार व्यावसायिक यांचे भंगारागाडयांचे प्लॉस्टिक सामान मिठीनदी पात्रात येऊन पडत असल्याने पावसाळयाच्या दिवसात पाणी साचण्याचा धोका लक्षात घेता स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी नदीपात्राची पाहणी केली. तसेच संबधितांविरुध्द कडक कारवाई करुन येथील भंगार हटविण्याचे आदेश दिले. याप्रसंगी प्रमुख अभियंता (घ.क.व्य) सिराज अन्सारी, एच/पूर्व विभागाचे सहाय़क आयुक्त गारोळे हे उपस्थित होते.
स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी यावेळी नदीपात्राच्या दोन्ही बाजूने पाहणी केली. नदीपात्रालगतच्या भंगार व्यावसायिकांविरुध्द कारवाई करण्यास टाळाटाळ का करण्यात येत आहे याचा संबधित विभागाच्या अधिकाऱयांना जाब विचारुन तातडीने येथील संपूर्ण भंगार हटविण्याचे त्यांनी आदेश दिले. त्यासोबतच आपल्या कर्तव्यात कुचराई करणाऱया संबधित अधिकाऱयांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले. एल विभाग व एच/पूर्व विभाग या दोन विभागाच्या हद्दीत हा परिसर येत असल्याने भंगार व्यावसायिक याचा याठिकाणी गैरफायदा घेत असल्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी संबधित विभागाच्या निदर्शनास आणून दिले.येत्या दोन ते तीन दिवसात धडक कारवाई न झाल्यास पालिका आयुक्तांसमवेत पुन्हा या परिसराची पाहणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment