आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे पनवेलमधील अंतर्गत रस्त्यांचेही काँक्रीटीकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 April 2017

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे पनवेलमधील अंतर्गत रस्त्यांचेही काँक्रीटीकरण


पनवेल (प्रतिनिधी) पनवेलमधील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण अंतिम टप्यात असताना या कामातील उर्वरित निधी परत न पाठवता मुख्य रस्त्यांना लागून असलेल्या अंतर्गत रत्यांचेही काँक्रीटीकरण करावे या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार एमएमआरडीएने कोळीवाडा स्मशानभूमीकडे जाणारा अंतर्गत रस्ता सिमेंटीकरण करण्यास घेतला आहे. आ. प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळेच एमएमआरडीएने सिमेंट काँक्रिटीकरांसाठी मंजूर केलेल्या ४७ कोटी रुपयांपैकी उर्वरित १२ कोटी रुपये अंतर्गत रस्ते करण्यासाठी वापरला जाणार आहे.

पनवेल शहरातील मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे वचन आ. प्रशांत ठाकूर यांनी एमएमआरडीएकडे पाठपुरावा करून पूर्ण केले आहे.बऱ्याचदा निविदा स्पर्धेत प्रशासनाने बनविलेल्या अंदाजपत्रापेक्षा कमी पैशात काम पूर्ण होते. त्यामुळे उर्वरित रक्कम शासनाकडे जमा होत असते. हि बाब आ. प्रशांत ठाकूर यांच्या लक्षात आल्याने या सिमेंट काँक्रिटीकरनाच्या कामातून उरलेली १२ कोटी रुपये इतकी रक्कम परत न पाठविली जाता मुख्य रस्त्याच्या शेजारील महत्वाच्या रस्त्यावर केला जावा अशी सूचना त्यांनी एमएमआरडीएला केली होती.याबाबत नगरपरिषदेनेही तसा ठराव केला होता मात्र याबाबत एमएमआरडीएने फारशी दखल घेतली नव्हती. अखेर आ. प्रशांत ठाकूर यांच्या आग्रही मागणीमुळे एमएमआरडीए अंतर्गत रस्त्यांवरही काम करताना दिसत आहे. त्यानुसार उरण नाका ते पनवेल कोळीवाडा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया ते मार्केटयार्ड कडे जाणारा रस्ताही करण्यात येत आहे. हि दोन कामे २ कोटी रुपयांची आहेत. उर्वरित कामेही एमएमआरडीएकडून करण्यात येतील त्यामुळे पनवेलकर आ. प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad