पनवेल (प्रतिनिधी ) गाडीची काच खाली न करता आपल्याच तोऱ्यात वावरणारे आमदार खासदार अनेक आहेत पण स्वतःच्या गाडीतून उतरून संकटात असलेल्या व्यक्तीला मदत करून धीर देणारे फार कमी. त्यातीलच एक आहेत रायगड जिल्हातील पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर. रस्त्यावरील अपघातात संबंधित व्यक्तीला केवळ सहानुभूती न देता त्याला त्याच्या घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.
सोमवारी (दिनांक २४ एप्रिल) दुपारी २ च्या सुमारास पेण वरून मिटिंग उरकून प्रशांत ठाकूर पनवेलला येत असताना खारपाडा पुलानंतरच्या चढावर एक दुचाकीस्वार तरुण दोन्ही गाड्यांच्यामध्ये त्याची ऍक्टिव्ह स्लिप झाल्यामुळे पडल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. तात्काळ आ. प्रशांत ठाकूर यांनी खाली उतरून त्या युवकाला स्वतः पाणी पाजले. आणि अपघाताचा आढावा घेतला तसेच युवकाला आधार दिला. त्याच्या डोक्याला मार लागला होता आणि त्याची गाडीही खराब झाली होती. यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य राम घरत यांना आ. प्रशांत ठाकूर यांनी या तरुणाला घरी सोडायला सांगितले. त्यानुसार त्याला गावी सोडण्यात आले तसेच त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. कैलास म्हात्रे असे या युवकाचे नाव असून तो जिते या गावचा आहे.
No comments:
Post a Comment