सामाजिक न्याय मंत्री बडोले, भीमराव आंबेडकर उपस्थित राहणार
हारफुलांऐवजी "एक वही, एक पेन' घेऊन या - स्मारक समितीचे आवाहन मुंबई- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानाचा पाचवा वर्धापन दिन सोहळा बुधवारी (२६ एप्रिल) सायंकाळी ४ वाजता संपन्न होत आहे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत असलेल्या या कार्यक्रमासाठी येताना "हारफुलांऐवजी" "वह्यापेन व पेन्सिल" सोबत घेऊन यावेत असे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने केले आहे. दरम्यान सायंकाळी होणाऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बांगला वजा निवासस्थान पुण्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी आहे . हे निवासस्थान अन्य व्यक्तीच्या ताब्यातून घेण्यास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला प्रदिर्घ लढ्यानंतर दि. 26.4.2012 ला यश आले आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सदर निवासस्थानाला भेट दिल्यानंतर या स्मारकाच्या विकासासाठी नुकताच एक कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे . या पार्श्वभूमीवर उद्या २६ एप्रिल रोजी ऐतिहासिक या वास्तूचा पाचवा वर्धापन दिन संपन्न होत आहे.दिवसभर विविध कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले आहेत सायंकाळी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले,भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट,आमदार बाळा भेगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत , या कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून आंबेडकरी जनता या वस्तूला भेट देण्यासाठी येत असते यावेळी येताना हारफूले मेणबत्ती अगरबत्ती आदी वस्तूंऐवजी किमान एक वही एक पेन सोबत यावेत असे आवाहन विश्वरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने केले आहे जमा झालेले हे साहित्य गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे
No comments:
Post a Comment