
शनिवार दि.२९ एप्रिल रोजी सकाळी प्रभाग क्रमांक १९७ मधील पंचशिल को. ऑप. सोसा.लि., हिंदू स्मशानभूमी (सोनापूर), जिजामाता नगर, आनंद नगर, कांबळे नगर, स्वामी नगर, माता रमाबाई आंबेडकर नगर, सुभाष नगर, मरिअम्मा नगर, भैयासाहेब आंबेडकर नगर, व्हि.पी.नगर, मार्कंडेश्वर नगर, मोतीलाल नेहरू नगर, महात्मा फुले नगर, डेअरी वसाहत इत्यादी परिसरामधील नाले सफाई, पथ दिवे (स्ट्रीट लाईट पोल) व मैदानांच्या सुशोभीकरणाच्या कामांचा शुभारंभ कार्यसम्राट नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या प्रयत्नाने करण्यात आला. त्या प्रसंगी महानगर पालिका अधिकारी, कर्मचारी, उपविभाग अध्यक्ष केशव पंदिरकर, रुबिना शेख, श्वेता बांदकर यांच्या सह प्रभागातील उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष तसेच असंख्य मनसैनिक उपस्थित होते.

