बेस्ट समिती अध्यक्ष व शिक्षण समिती अध्यक्षा यांचा परळ कर्मचारी वसाहत पाहणी दौरा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2017

बेस्ट समिती अध्यक्ष व शिक्षण समिती अध्यक्षा यांचा परळ कर्मचारी वसाहत पाहणी दौरा

सोमवार दिनांक २९ मे २०१७ रोजी सकाळी ११-३० वाजता शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्या विनंतीनुसार परळ कर्मचारी वसाहत येथे पाहणी दौरा आयोजित केला होता. मुंबई महापालिकेच्या ताब्यात असलेले १५ निवासी गाळे पुन्हा बेस्ट उपक्रमाच्या ताब्यात देण्यासंदर्भात सदर वसाहत येथील पाहणी दौऱ्याच्या वेळी गुडेकर व कोकीळ यांच्या व्यतिरिक्त महापालिकेचे उप शिक्षण अधिकारी, प्रकाश च-हाटे , एफ दक्षिण विभागाचे प्रशासकीय अधिकारी मोरे , एफ दक्षिण विभागाचे सहायक अभियंता-देखभाल, रायकवाड, बेस्ट उपक्रमाचे सहायक महाव्यवस्थापक खाचणे व स्थावर व्यवस्थापक सुमंत हे अधिकारी उपस्थित होते. गुडेकर यांनी पाहणी दौऱ्याच्या अखेरीस सध्या महापालिकेच्या ताब्यात असलेले १५ निवासी गाळे पुन्हा बेस्ट उपक्रमाच्या ताब्यात देण्याकरिता आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे मान्य केले.

Post Bottom Ad